तरुण भारत

मराठा क्रांती मोर्चाची क्रांतीदिनी सोमवारी पुण्यात बैठक

खासदार संभाजीराजे करणार मार्गदर्शन

प्रतिनिधी / कोल्हापूर

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुण्यात क्रांतीदिनी सोमवार 9 ऑगस्ट रोजी राज्यातील मराठा समन्वयकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती या बैठकीला पूर्णवेळ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यातील म्हात्रे ब्रीज, कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्सवर सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरूवात होणार आहे.

Advertisements

संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारकडे मांडल्या होत्या. त्यातील किती मागण्या, मुद्द्यांची पूर्तता झाली. त्याचबरोबर केंद्र सरकारने बुधवारी 102 व्या घटनादुरूस्तीच्या विधेयकात दुरूस्ती करत राज्य सरकारांना आरक्षण देण्याचे अधिकार बहाल केले. या निर्णयानंतर मराठा आरक्षणाबाबत पुढील काळात कोणती भूमिका घेणे आवश्यक आहे, या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Related Stories

कोल्हापूर : अज्ञातांकडून ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकास बेदम मारहाण

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात ७ कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

शिक्षण महर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी

Abhijeet Shinde

लातूर जिल्ह्यात कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ वर

Abhijeet Shinde

गणेशोत्सव काळात सुकामेव्याची विक्री ५० टक्क्यांनी घटली

Abhijeet Shinde

सूर्याभोवतीच्या खळ्याचे कोल्हापुरात दर्शन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!