तरुण भारत

शिवाजी विद्यापीठ देणार प्रवेश शुल्कात 20 टक्के सवलत

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिये संदर्भात निर्णय

प्रतिनिधी / कोल्हापूर

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश शुल्कात सूट देण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत. त्यानुसार 2020-21 या शैक्षणिक वर्षात पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशा वेळीच शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क वगळता 20 टक्के सवलत द्या, अशा सूचना महाविद्यालये आणि अधिविभागांना परिपत्रकाव्दारे विद्यापीठ प्रशासनाने दिल्या आहेत.

Advertisements

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना 20 टक्के प्रवेश शुल्कात सुट दिली जाणार आहे. कॅरी फॉरवर्ड पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आले, अशा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 20 टक्के परीक्षा परत करायचे असल्याने याबाबत प्रस्ताव पूरक कागदपत्रांसह परीक्षा विभागाकडे सादर करायचा आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठ अधिविभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणारे जिमखाना, विविध गुणदर्शन उपक्रम, कॉलेज मॅगझीन, संगणक, क्रीडा, वैदयकीय मदत, युथ फेस्टिवल, आदी वापरात न आलेले शुल्क परत करावयाचे आहे. तसेच 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश शुल्क चार हप्त्यांत भरण्याची सवलत देण्यात यावी. प्रयोगशाळा व ग्रंथालय देखभाल व ग्रंथालयात ई-कन्टेंट विकत घेण्यात खर्च झाल्याने यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. पारंपारिक अभ्यासक्रम आणि व्यवसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क वेगवेगळे आहे. त्यामुळे 20 टक्के शुल्काप्रमाणे प्रत्येक अभ्यासक्रमाची वेगवेगळी रक्कम मिळणार, याची विद्यार्थ्यांनीही दखल घ्यावी.

या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात 100 टक्के सवलत

ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात 100 टक्के सवलत दिली जाणार आहे. याची दखल घेत महाविद्यलय व अधिविभागांनी आपआपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 100 टक्के प्रवेश शुल्कात सवलत देवून, त्याचा अहवाल विद्यापीठाला सादर करावा.

महाविद्यालयांनी शासन आदेशाचे पालन करावे

महाविद्यालय व अधिविभागांनी शासन आदेशानुसार प्रवेश शुल्कात सवलत द्यावी. तसेच यापुर्वी वापरात न आलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे. विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश शुल्कातील सवलती संदर्भात ई-मेलव्दारे महाविद्यालयांना सूचना केलेल्या आहेत.

डॉ. विलास नांदवडेकर (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)

Related Stories

युवा पत्रकार अमृत मंडलिक यांची आत्महत्या

triratna

चित्रकार बळवंत लिमये यांचे निधन

triratna

आमदार राजेश पाटील विरोधी आघाडी समवेत; रात्री उशिरापर्यंत खलबते

triratna

कृष्णानदीच्या पाणी पातळीत 17 फुटांनी वाढ

triratna

जिल्हा परिषदेला कोणी सीईओ देता का सीईओ

Patil_p

संचारबंदीत ही बाजारपेठा गजबजल्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!