तरुण भारत

वैज्ञानिकासारखी दिसणारी बार्बी डॉल

सारा गिल्बर्ट यांचा कंपनीकडून सन्मान : व्हॅक्सिनोलॉजिस्ट होण्याबद्दल मुलांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न

कोरोना विषाणूवरील लस निर्माण करणाऱया ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिक प्राध्यापिका डॅम सारा गिल्बर्ट यांच्या सन्मानार्थ बार्बी डॉल तयार करणाऱया कंपनीने त्यांच्यासारखी दिसणारी डॉल तयार केली आहे.

Advertisements

विज्ञान, तंत्रज्ञान आणि  इंजिनियरिंग (स्टेम) या क्षेत्रात कारकीर्द घडवू पाहणाऱया मुलींना प्रेरित करणारा हा सन्मान आहे. सर्व जगासमोर विज्ञानात कारकीर्द घडविणे किती महत्त्वाचे आहे हे या मुलींना समजणार आहे. माझ्या सन्मानार्थ तयार करण्यात आलेली बार्बी डॉल पाहून मुलामुलींनी व्हॅक्सिनोलॉजिस्ट म्हणूनही कारकीर्दीत अपार संधी असल्याचे जाणून घ्यावे असे सारा यांनी म्हटले आहे. पहिल्यांदा त्यांनी ही बार्बी डॉल पाहिली तेव्हा त्यांना अजब वाटले. पण ही डॉल अन्य मुलांना प्रेरित करेल अशी अपेक्षा त्यांना आहे.

यापूर्वीही अनेक महिलांच्या सन्मानार्थ हुबेहुब त्यांच्यासारख्या बार्बी डॉल तयार करण्यात आल्या आहेत. एका अमेरिकन फेन्सरला सन्मान देण्यासाठी सर्वप्रथम 2017 मध्ये हिजाब परिधान केलेली बार्बी डॉल सादर करण्यात आली होती. या ऍथलिटने हिजाब परिधान करून ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता.

Related Stories

3922 पायऱया असणारी स्वर्गाची शिडी

Patil_p

‘बर्निंग बोट’मध्ये 36 जणांचा मृत्यू

Patil_p

गावातील प्रत्येक जण शुद्ध शाकाहारी

Patil_p

WHO भारतात उभारणार पारंपरिक औषधांचे जागतिक केंद्र

datta jadhav

कोरोनानंतर चीनमध्ये आता भूकंपाचा कहर

Patil_p

हिंदूंविरोधात हिंसाचार सूत्रधारास अटक

Patil_p
error: Content is protected !!