तरुण भारत

केएल राहुलचे अर्धशतक, अँडरसनचे दोन बळी

नॉटींगहॅम : येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत गुरूवारी खेळाच्या दुसऱया दिवशी भारताने उपाहारापर्यंत पहिल्या डावाला सावध प्रारंभ केला. पण उपाहारानंतर अँडरसनने आपल्या एकाच षटकात कर्णधार कोहली आणि पुजारा यांना पाठोपाठ चेंडूवर बाद करून भारतावर पुन्हा दडपण आणले. रहाणे 5 धावांवर धावचीत झाला. 46.1 षटकांत 4 बाद 125 धावा झाल्या असताना पाऊस व अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला होता. यावेळी राहुल 57 व पंत 7 धावांवर खेळत होते.

या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 183 धावांत आटोपल्यानंतर भारताने बिनबाद 21 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. भारताने सावध फलंदाजी करीत उपाहारापर्यंत 1 बाद 97 धावांपर्यंत मजल मारली होती.

Advertisements

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प. डाव सर्वबाद 183, भारत प.डाव 46.1 षटकांत 4 बाद 125 (रोहित शर्मा 36, पुजारा 4, कोहली 0, रहाणे 5, राहुल खेळत आहे 57, अवांतर 16, अँडरसन 2-15, रॉबिन्सन 1-32, करन 0-25).

Related Stories

कॉर्नवालचे नाबाद शतक, लकमलचे 5 बळी

Patil_p

कुस्तीशौकिनांना हुरहूर राहुलच्या हुकलेल्या विजयाची

datta jadhav

पोर्तुगालच्या रोनाल्डोचा 750 वा गोल

Patil_p

बीसीसीआयची विनंती फेटाळण्याची शक्यता

Patil_p

पाकचा दक्षिण आफ्रिकेवर 3 गडय़ांनी विजय

Patil_p

महेंद्रसिंह धोनीचा ‘किलर’ लूक पाहिला का?

triratna
error: Content is protected !!