तरुण भारत

पंजाबच्या हॉकीपटूंना प्रत्येकी 1 कोटी बक्षीस जाहीर

चंदीगड : मनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने गुरूवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावून भारतीय हॉकीच्या इतिहासात नवे सुवर्ण दालन उघडण्याचा पराक्रम केला. भारतीय हॉकी संघावर संपूर्ण देशातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. तब्बल 41 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या संघातील पंजाबच्या प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

कांस्य†िवजेत्या भारतीय हॉकी संघामध्ये पंजाबच्या आठ हॉकीपटूंचा समावेश असून प्रत्येक हॉकीपटूला पंजाब शासनातर्फे 1 कोटी रूपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री राणा गुरमित सिंग सोधी यांनी दिली. भारतीय हॉकी संघाचे मायदेशात आगमन झाल्यानंतर पंजाब शासनातर्फे विजयोत्सव साजरा केला जाणार असल्याची घोषणा क्रीडामंत्री सौधी यांनी केली.

Advertisements

कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघामध्ये कर्णधार मनप्रित सिंग, हरमनप्रित सिंग, दिलप्रित सिंग, रूपिंदरपॉल सिंग, हार्दिक सिंग, समशेर सिंग, गुर्जंत सिंग आणि मनदीप सिंग हे पंजाबचे खेळाडू आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळविल्यास पंजाबच्या प्रत्येक खेळाडूंला 2.25 कोटी रूपयांचे बक्षीस पंजाबचे क्रीडामंत्री सौधी यांनी यापूर्वी जाहीर केले होते. 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर भारतीय हॉकी संघाला पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविता आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भारतीय हॉकी संघाचे खास अभिनंदन केले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले आहे.

Related Stories

इंग्लंड दौऱ्यातील भारतीय महिला संघाचा पहिला विजय

Patil_p

सेरेना, वोझ्नियाकी शेवटच्या चार खेळाडूत

Patil_p

पॅट्रीअट्स उपांत्य फेरीत, गयाना, सेंट लुसिया किंग्ज विजयी

Patil_p

पुण्याचा महेंद्र चव्हाण नवा महाराष्ट्र श्री

tarunbharat

वुल्व्ह्सची अर्सेनलवर मात, जिमेनेझला दुखापत

Patil_p

लीग रद्द करण्याची शिफारस, बगान विजेते

Patil_p
error: Content is protected !!