तरुण भारत

मीराबाईच्या मदतीसाठी मोदींची मध्यस्थी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :   

भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूला वैद्यकीय मदत आणि प्रशिक्षण मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी केली होती. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे.  

Advertisements

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात खुलासा केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या दोन खेळाडूंना वैद्यकीय मदत आणि प्रशिक्षण मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मध्यस्थी करावी लागली होती. यामध्ये मणिपूरच्या मीराबाई चानूचाही समावेश होता. दरम्यान, मीराबाईने सत्कारासाठी एका आयोजित कार्यक्रमात बोलताना आपल्याला मोदींकडून मिळालेल्या मदतीचा उल्लेख केला होता. पंतप्रधानांकडून आपल्याला स्नायूच्या सर्जरीसाठी अमेरिकेत जाण्याची आणि प्रशिक्षण करण्याची संधी मिळाली नसती तर ऑलिम्पिकमध्ये मला यश मिळाले नसते, असे म्हटले होते.

Related Stories

राजस्थानमधील 8 शहरांमध्ये आजपासून ‘नाईट कर्फ्यू’

Rohan_P

केंद्रीय मंत्रिमंडळातील 24 मंत्र्यांवर गंभीर गुन्हे

datta jadhav

लोकशाहीच्या जपणुकीसाठी कटिबद्ध राहुया!

Patil_p

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

Patil_p

कथ्थक सम्राट बिरजू महाराज यांचे निधन

datta jadhav

नियंत्रण रेषेजवळील गोळीबारात दोन जवान शहीद

datta jadhav
error: Content is protected !!