तरुण भारत

पंतप्रधान मोदींनी ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचं नाव बदललं

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

नवी दिल्ली/प्रतिनिधी

Advertisements

देशातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार म्ह्णून राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जातो. पण पंतप्रधान मोदी यांनी हे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल अशी घोषणा केली आहे. मोदींनी खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावे देणं योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मोदींनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी “देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचं नाव देणंच योग्य आहे” असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Related Stories

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जाहीर

Rohan_P

रशियासोबत सुरू झाले ‘वॅक्सिन वॉर’…

datta jadhav

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी

Rohan_P

बुंदेली महिलांची व्यवसायात भरारी

Patil_p

धार्मिकतेतून विधायक समाजसेवा होणे गरजेचे : डॉ. विठ्ठल जाधव

Rohan_P

राजकीय पक्षांनी कलंकितांना उमेदवारी नाकारावी

Patil_p
error: Content is protected !!