तरुण भारत

अमोल कोल्हेंनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊतांची घेतली भेट, ट्वीट करत म्हणाले…

मुंबई/प्रतिनिधी

शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच अमोल कोल्हेंनी घेतली संजय राऊतांची भेट घेतली आहे. याभेटीची माहिती खुद्द खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. दरम्यान, अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी कडून अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीसाठी शिरुर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे आढळराव पाटील यांचा पराभव करत निवडणूक जिंकली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीबाबत ट्विट केले आहे. दिल्लीत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेषणादरम्यान ही भेट झाल्याचे बोलल्या जात आहे. शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच अमोल कोल्हे आणि संजय राऊत एकत्र पहायला मिळाले. दरम्यान, संजय राऊत यांची भेट पर्वणी असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या भेटीबाबत कोल्हे म्हणाले, “शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली.त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते. महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. मतदारसंघात ‘महाविकास आघाडी’ म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होइल.” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Advertisements


Related Stories

बिजलिमल्ल माजी आमदार संभाजी पवार यांचे सांगलीत निधन

Abhijeet Shinde

कोल्हापूर विभागात सातारा दुसऱया स्थानी

Patil_p

पोलिसांच्या मदतीने बँके बाहेरील गर्दी हटली

Patil_p

महिला बचतगटांना प्रकल्प संचालकांची सक्त ताकीद

Patil_p

शिमला : ज्यूरी कॉलनीतील आयटीबीपीतील 18 जवान कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या नूतन पदाधिकाऱयांची निवड

Patil_p
error: Content is protected !!