तरुण भारत

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; नागपुरातील महाविद्यालयावर ईडीचा छापा

नागपूर/प्रतिनिधी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशमुखांविरोधात विरोधात ईडीनं आपल्या कारवाईचा फास अधिकाधिक आवळायला सुरुवात केली आहे. आज दुपारी ईडीनं अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या फेटरी येथील महाविद्यालयावर छापा टाकल्याची माहिती मिळते आहे. यासोबतच, ईडीनं नागपुरातल्या अनिल देशमुख यांच्याशी संबंधित इतर काही ठिकाणांवर देखील छापे टाकल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.

दरम्यान, एकीकडे ईडीनं वारंवार चौकशीसाठी नोटीस बजावून देखील अनिल देशमुख उपस्थित राहात नाहीत. तर दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी सुरूच ठेवली आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मार्गावर असलेल्या माऊरझरी येथील नागपूर इन्सिटट्युट ऑफ टेकनॉलॉजी (एनआयटी) महाविद्यालयावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापे टाकले. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisements

Related Stories

पुण्यातील रिक्षा स्थानके ही सांस्कृतिक केंद्र

Rohan_P

कोल्हापूर : सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन विरोधात मराठा आक्रमक

Abhijeet Shinde

कोरोना : महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण

Rohan_P

गुगल जिओमध्ये करणार 33 हजार 737 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

महाराष्ट्र : राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

केंद्राने कुंभमेळा, निवडणूक प्रचारांना परवानगी देऊन कोरोनाचा प्रसार केला : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!