तरुण भारत

फ्यूचर-रिलायन्स यांच्यातील व्यवहाराला ब्रेक

साधारणपणे 25,000 कोटींच्या डीलचा समावेश

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

रिलायन्स इंडस्ट्रिज आणि फ्यूचर ग्रुप यांच्यामध्ये साधारण 24,731 कोटी रुपयांचा होणारा व्यवहार अडचणीत सापडला आहे. कारण भारतातील सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये अमेरिकेतील दिग्गज ई कॉमर्स कंपनी ऍमेझॉनच्या बाजूने निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये सिंगापूरच्या  न्यायालयात दिलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत ही सुनावणी केली आहे. यामुळे  सिंगापूर न्यायालयाने सदरचा व्यवहार थांबविला होता.

सदरच्या व्यवहारासह ऍमेझॉन आणि किशोर बियाणी यांच्या फ्यूचर ग्रुप यांच्यामध्ये कायद्याची लढाई सुरु राहिल्याचे दिसून आले. ऍमेझॉनने सिंगापूर न्यायालयाची मदत घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. फ्यूचर ग्रुपने मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये फ्यूचर रिटेलसोबत आपल्या पाच लिस्टेड कंपन्यांचे फ्यूचर एंटरप्राईजेस लिमिटेडमध्ये अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. यानंतरच रिटेल व्यवसाय रिलायन्सकडे हस्तांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती आहे. हा व्यवहार 25,000 हजार कोटी रुपयांचा आहे. ऍमेझॉनने 2019 मध्ये फ्यूचर कूपन्समध्ये 49 टक्क्यांची हिस्सेदारी 1500 कोटी रुपयांना खरेदी केली होती. सदरच्या निर्णयामुळे शुक्रवारी मात्र मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या समभागाच्या भावात घसरण राहिल्याचे दिसून आले होते.

Related Stories

सहाशे डिलर्सच्या मदतीने मारुतीची विक्री पुन्हा सुरु

Patil_p

जेएसपीएलचे पोलाद उत्पादन 18 टक्क्यांनी तेजीत

Patil_p

हवाई इंधनाचे दर 50 टक्के वाढले

Patil_p

साखर उत्पादन 24 टक्क्यांनी वाढले

Amit Kulkarni

व्हॉट्सअपचे आता नवे फिचर

tarunbharat

ओएनजीसीची तेल, गॅस उत्पादन वाढविण्याची योजना

Patil_p
error: Content is protected !!