तरुण भारत

आधुनिक मीराबाई

सरकारी नोकरी आणि तीही आयपीएस अधिकारी या नात्याने, अशी स्थिती असताना कोणीही अगदी निवृत्तीच्या क्षणापर्यंत ही नोकरी करत राहील, यात काही नवल नाही. काही वेळा प्रकृती अस्वास्थ्य, कौटुंबिक समस्या किंवा नोकरीचा कंटाळा येणे यासाठी व्हीआरएस घेऊन घरी बसणे काही लोक पसंत करतात. तथापि, हरियाणामध्ये एक अशा महिला आयपीएस अधिकारी आहेत की त्यांनी कृष्णभक्तीत लीन झाल्याने नोकरी सोडण्याचा विचार चालविला होता.

कृष्ण हे त्यांचे आराध्य दैवत आहे. या दैवताच्या भक्तीत त्या इतक्मया बुडून गेल्या आहेत, की त्यांना आता भौतिक जगाचा आणि त्यातील कटकटींचा उबग आला आहे. कृष्णचरणी लीन होऊन आपले पुढचे आयुष्य सत्कारणी लावावे या इच्छेने त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊ केला होता. तथापि, हरियाणा सरकारने तो फेटाळला असून त्यांच्या सेवेची अद्यापही राज्य सरकारला आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. या महिला अधिकाऱयाचे नाव भारती अरोरा असे आहे.

Advertisements

त्या एक अत्यंत कर्तव्यकठोर, निष्कलंक आणि बुद्धिमान अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. आयपीएस या नात्याने काम करताना त्यांनी अनेक समाजकंटकांच्या छातीत धडकी भरविलेली आहे. त्यांचे सर्व्हिस रेकॉर्ड दृष्ट लागण्यासारखे स्वच्छ आहे. म्हणूनच त्यांच्या निवृत्तीचा प्रस्ताव हरियाणा सरकारने फेटाळला. त्यांची निवृत्ती दहा वर्षांनी (2031) होणार आहे.

Related Stories

मध्यान्ह आहारात मिळणार फोर्टिफाइड राइस

Patil_p

ऑस्ट्रेलियातून दूध आयातीचा प्रस्ताव नाही

Patil_p

मान्सून अखेर केरळात दाखल, भारतीय हवामान खात्याची माहिती

Rohan_P

पंजाब काँगेसमध्ये सिद्धूंना वाढता विरोध

Patil_p

हरियाणामध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 24,002 वर

Rohan_P

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल यांना कोरोनाची लागण

Rohan_P
error: Content is protected !!