तरुण भारत

दुखापतीमुळे आर्चर दोन महत्त्वाच्या स्पर्धेतून बाहेर

वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 26 वषीय जोफ्रा आर्चर याच्या उजव्या कोपराला दुखापत झाली असल्याने तो सध्या भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळू शकत नाही. त्याचप्रमाणे त्याला येत्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आणि आगामी ऍशेस मालिकेलादेखील मुकावे लागणार असल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली.

Advertisements

आर्चरच्या उजव्या हाताच्या कोपरामध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले आहे. ही दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी बराच कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे तो आगामी दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये खेळू शकणार नाही, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने स्पष्टीकरण दिले. 2019 साली झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने जेतेपद मिळविले. त्या यशात आर्चरचा वाटा महत्त्वाचा ठरला होता. आर्चरने आपल्या अल्पशा क्रिकेट कारकीर्दीमध्ये 13 कसोटी सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. 2019-20 च्या दक्षिण आफ्रिका दौऱयामध्ये आर्चरला ही दुखापत झाली होती. गेल्या मे महिन्यात त्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतरही आर्चर अद्याप पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही.

Related Stories

पत्नीला मारून पोलिसाची आत्महत्या

Patil_p

राज्यात रुग्ण संख्या 151

Patil_p

छत्तीसगडमधील धर्मांतर अधिक धोकायदायक !

Patil_p

काळा नवरा नको…

Patil_p

खुशखबर! ‘सीरम’ने केली आणखी एका लसीची घोषणा

datta jadhav

देशात 18,222 नवे बाधित, 228 मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!