तरुण भारत

युफा पात्रता स्पर्धेतही व्हीएआरचा वापर

वृत्तसंस्था / पॅरिस

2022 साली होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या युरोपियन पात्रता स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये आता व्हिडिओ असिस्टेड रेफरिंग (व्हीएआर) पद्धतीचा वापर केला जाईल, अशी घोषणा युफाच्या अधिकाऱयांनी गुरुवारी केली.

Advertisements

2022 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पहिल्या तीन फेऱयातील सामन्यांमध्ये व्हीएआरचा वापर करण्यात आला नव्हता. आता पात्र फेरीची ही स्पर्धा पुन्हा सप्टेंबरमध्ये पुढे सुरू केली जाईल त्यावेळी, व्हीएआर या नव्या सुविधेचा उपयोग केला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे पात्र फेरीतील काही सामने लांबणीवर टाकण्यात आले होते. आता इंग्लंड, स्पेन, जर्मनी, इटली आणि फ्रान्समध्ये होणाऱया प्रमुख पाच युरोपियन लीग स्पर्धेमध्ये तसेच चॅम्पियन्स लीग स्पर्धेतही व्हीएआरचा वापर केला जाणार आहे.

Related Stories

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा अफगाणला इशारा

Amit Kulkarni

पीसीबी अध्यक्षपदासाठी रमीझ राजा आघाडीवर

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा लंकेवर डावाने विजय

Patil_p

कौंटी क्रिकेटपटूंच्या वेतनामध्ये कपात

Omkar B

फिफा वर्ल्डकप पात्रता स्पर्धाही लांबणीवर

tarunbharat

मोठी बातमी : कोरोनामुळे आयपीएल स्थगित;बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची घोषणा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!