तरुण भारत

लायोनेल मेस्सीचा बार्सिलोनाला निरोप

वृत्तसंस्था/ माद्रिद

अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीने बार्सिलोना फुटबॉल क्लबचे गेली अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले होते. आता त्याने बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मेस्सीचा सहभाग आपल्या क्लबमध्ये राहणार नाही, अशी घोषणा बार्सिलोना क्लबच्या वरि÷ अधिकाऱयांनी केली आहे.

Advertisements

स्पॅनिश फुटबॉल क्षेत्रातील बार्सिलोना फुटबॉल क्लब हा अव्वल आणि आघाडीचा म्हणून ओळखला जातो. बार्सिलोना क्लबची सध्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने मेस्सीबरोबर नवा करार करण्याची क्षमता या क्लबमध्ये नसल्याचे स्पष्टीकरण वरि÷ अधिकाऱयांनी दिले आहे. बार्सिलोना क्लबकडून गेली 17 वर्षे मेस्सी विविध स्पर्धांमध्ये खेळत होता. या क्लबशी वारंवार नवा करार मेस्सीबरोबर केला जात होता. 2017 साली बार्सिलोना क्लबने मेस्सीबरोबर नवा करार केला होता आणि या करारापोटी प्रत्येक फुटबॉल हंगामासाठी मेस्सीला या क्लबकडून 163 दशलक्ष डॉलर्सची रक्कम दिली जात असे.

आता प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱया मँचेस्टर सिटी आणि पॅरिस सेंट जर्मन फुटबॉल क्लब मेस्सीबरोबर नवा करार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण मेस्सीकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. मेस्सीच्या उपस्थितीत बार्सिलोना क्लबने विविध 35 फुटबॉल स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याने या क्लबला चारवेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे जेतेपद तसेच दहावेळा स्पॅनिश लीग स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळवून दिले आहे. वयाच्या 13 व्या वषी मेस्सीचे बार्सिलोनामध्ये आगमन झाले होते.

Related Stories

सुरक्षितता असेल तरच राष्ट्रीय क्रिकेट शक्य : गांगुली

Patil_p

अश्व दौड चाचणी स्पर्धा मुंबईत

Patil_p

54 राष्ट्रीय फेडरेशन्सना मान्यता

Patil_p

आगामी आय लीग फुटबॉल स्पर्धेत दिल्ली दोन संघ उतरविणार

Patil_p

‘त्या’ चेंडूचा वेग प्रतितास 175 नव्हताच!

Patil_p

सिग्नेचर स्टाईल… युसेन बोल्ट…अन् आरसीबीला पाठिंबा!

Amit Kulkarni
error: Content is protected !!