तरुण भारत

टायर्सच्या मोठय़ा साठय़ाला आग

अंतराळातून दिसून आले काळे ढग

वृत्तसंस्था / कुवैत सिटी

Advertisements

जगातील ‘टायर्सच्या सर्वात मोठय़ा साठय़ा’मधून विषारी धूर निघत आहे. छायाचित्रांमधून हे भयावह दृश्य पाहिले जाऊ शकते. हे ठिकाण आणि तेथून निघणारा धूर अंतराळातूनही दिसून येतोय. कुवैतच्या सुलैबिया क्षेत्रात खोदण्यात आलेल्या विशाल आकाराच्या खड्डय़ात सुमारे 70 लाख टायसं आहेत. 6 एकरामध्ये फैलावलेल्या जागेत आग लागल्यावर निघणाऱया धुराची छायाचित्रे उपग्रहांनी कैद केली आहेत.

 हे टायर्स कुवैत आणि अन्य देशांचे असल्याचे मानले जात आहे. या टायर्सची विल्हेवाट लावण्याची जबबादारी 4 कंपन्यांना देण्यात आली होती. 50 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचणाऱया देशामध्ये असे ज्वलनशील पदार्थ जमा करण्याबद्दल लोकांकडून प्रश्न विचारला जात आहे. कुवैतच्या सरकारने वाळवंटात टायर्सची विल्हेवाट लावण्यास सुरू केले आहे. पुनर्वापर करण्यात येणारे 95 टक्के टायर्स हटविण्याची योजना आहे.

2012 मध्ये कुवैतच्या एका दुसऱया टायर डंपमध्ये आग लागल्याने 50 लाख टायर्स जळून खाक झाले होते. वाऱयाने विषारी धूर समुद्राच्या दिशेने ढकलल्याने स्थानिक लोक सुदैवी ठरले होते. अनेक देशांमध्ये वापरण्यात आलेल्या टायर्सची विल्हेवाट लावणे एक समस्या ठरली आहे. टायर जाळण्यात आल्यावर हवेत कार्सिनोजेनिक डायऑक्साइन्स मिसळतात. प्रदूषक अस्थमा आणि अन्य गंभीर आरोग्य समस्यांना जन्म देऊ शकतात. ब्रिटनमध्ये दरवर्षी सुमारे 4 लाख 86 हजार टन वजनाचे टायर्स फेकले जातात. यातील सर्व टायर्सचा पुनर्वापर केला जातो.

Related Stories

दक्षिण कोरियाचे पाऊल

Patil_p

चीन पुन्हा कोरोनाच्या विळख्यात

Patil_p

एड्सवर औषध सापडल्याचा ब्राझीलच्या संशोधकांचा दावा

datta jadhav

ट्रम्प-बायडन अटीतटीचा संग्राम

Omkar B

1 हजार प्रेयसी असणाऱया धार्मिक नेत्याला 1,075 वर्षांची शिक्षा

Patil_p

भारतीय महिलेला ट्रम्प यांच्या हस्ते नागरिकत्व

Patil_p
error: Content is protected !!