तरुण भारत

सायबेरियात सापडली 28 हजार वर्षे जुनी सिंहिण

दात अन् केस अद्याप सुरक्षित

सायबेरियाच्या बर्फात गोठले गेलेल्या अवस्थेत एक पूर्णपणे संरक्षित सिंहाच्या मादी छाव्याचा मृतदेह सापडला आहे. तिचा मृत्यू सुमारे 28 हजार वर्षांपूर्वी झाला होता. जीवांशी संबंधित एका नव्या अध्ययनात याची माहिती देण्यात आली आहे. हे आतापर्यंत आढळून आलेल्या सर्वात चांगल्याप्रकारे संरक्षित हिमयुगीन प्राण्यांपैकी एक आहे. सेंटर फॉर पॅलियोजेनेटिक्स स्टॉकहोम, स्वीडनच्या टीमने याला ‘स्पार्टा’ नाव दिले आहे.

Advertisements

मृत्यूवेळी मादा छाव्याचे वय 2 महिन्यांपेक्षाही कमी होते. ही सिंहिण सोनेरी फरने आच्छादलेली आढळली आहे. सिंहिणीचे दात, त्वचा आणि मिशा अद्याप कायम आहेत. त्यांना पर्माफ्रॉस्टमध्ये संरक्षित करण्यात आले होते, जे जमिनीवर किंवा त्याखाली असा पृष्ठभाग असतो, जेथील तापमान सातत्याने शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहते. ही सिंहिण दोन विलुप्त झालेल्या ‘बिग कॅट’ छाव्यांपैकी एक होती, जिला सेम्युल्याख नदीच्या काठावर मॅमथ टस्क हंटर्सनी शोधले होते.

दुसरा छावा 43,448 वर्षे जुना

हे दोन्ही छावे भाऊबहिण असावेत असा अनुमान आहे. कारण ते केवळ 49 फूटांच्या अंतरावर आढळले होते. रेडिओ कार्बन डेटिंगनुसार बोरिस नावाच्या दुसऱया छाव्याचे वय अधिक आहे, तो 43,448 वर्षांपूर्वीचा आहे. मृत्यूवेळी त्याचे वय देखील 1-2 महिन्यांदरम्यान होते.

दुर्घटनेचे शिकार

स्कॅनमध्ये सिंहांच्या डोक्यांमधील जखमा दिसून आल्या आहेत. बहुधा हे छापे मडस्लाइडमध्ये मारले गेले असावेत किंवा पर्माफ्रॉस्ट एखाद्या दरीत कोसळले असावेत असे संशोधकांनी म्हटले आहे. 2017 आणि 2018 दरम्यान पूर्व सायबेरियात त्यांचा शोध लागला होता.

Related Stories

जपानमध्ये वर्षभरात सर्वात कमी विवाह

Patil_p

मेंदूवरही प्रभाव पाडतोय कोरोना विषाणू

Omkar B

दाऊद इब्राहिमला पाकचा आश्रय

Patil_p

हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

datta jadhav

तालिबान विरोधात सरसावली महिला गव्हर्नर

Patil_p

ट्रम्प यांच्यावर बायडन संतापले

Patil_p
error: Content is protected !!