तरुण भारत

महामार्गाचे सहापदरीकरण – सर्व्हेला बेन्नाळीपासून सुरुवात

रस्त्याच्या दोन्ही बाजूला करण्यात आले मार्किंग

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

महाराष्ट्राला जोडणाऱया महामार्ग क्रमांक 4 (एनएच-4) या रस्त्याचे सहा पदरीकरण होणार आहे. त्याबाबत नोटिफिकेशन देण्यात आले होते. याचबरोबर शेतकऱयांना आणि मालमत्ताधारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता शनिवारी बेन्नाळी येथून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी सर्व्हे करण्यास सुरुवात केली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जमीन आणि मालमत्ताधारकांना नोटिसा दिल्या होत्या. शनिवारी आम्ही येत आहे, तुम्ही तेथे उपस्थित रहा, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे खडबडून जागे झालेले शेतकरी तसेच मालमत्ताधारक शनिवारी त्यांची वाट पाहत थांबले असता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दाखल झाले.

शनिवारी बेन्नाळी येथील लुमाण्णा जोतिबा टक्केकर, तुकाराम लक्ष्मण पाटील, अशोक नारायण पाटील यांच्यासह इतर शेतकऱयांच्या जमिनींचा सर्व्हे केला. काही ठिकाणी 25 ते 40 फुटांपर्यंत जमीन गेली आहे, तर काही ठिकाणी 10 ते 20 फूट जमीन गेली आहे. बेन्नाळीपासून कोगनोळीपर्यंत हा सर्व्हे होणार आहे. टप्प्याटप्प्याने आता या सर्व्हेला सुरुवात होणार आहे.

काही जणांनी यापूर्वीच सोडली होती जागा

राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार याची कल्पना काही जणांना होती. मात्र, इतक्मया लवकर या रस्त्याचे सहा पदरीकरण होईल याची कोणीच कल्पना केली नव्हती. अचानकपणे एका इंग्रजी आणि कन्नड वृत्तपत्राला नोटिफिकेशन देऊन शेतकऱयांना नोटिसा देण्यात आल्या. त्यामुळे आता शेतकऱयांना न्यायालयीन लढाई लढण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे काही जणांनी न्यायालयात जाण्याची तयारीदेखील केली.

यापूर्वी रस्त्यामध्ये घरे तसेच जमिनी गेलेल्या शेतकऱयांनी आणि मालमत्ताधारकांनी सर्व्हिस रस्त्यापासून बऱयाच अंतरावर आपली घरे बांधली होती. रस्त्यात जमीन गेली तरी पुन्हा त्रास होऊ नये याची खबरदारी अनेकांनी घेतली होती. 

दोन्ही बाजूला करण्यात येत आहे मार्किंग

रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्व्हे करून मार्किंग केले जात आहे. काही ठिकाणी 20 ते 25 फूट जागा जात आहे. त्यामुळे अनेकांना फटका बसणार आहे. सध्या बेन्नाळीपासून कोगनोळीपर्यंत हा सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यामुळे  शेतकऱयांमध्ये आणि मालमत्ताधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आपली जागा किती जाणार, आपले घर जाणार का? या विवंचनेतच अनेक जण आहेत.  

Related Stories

एमव्हीएम, कनक, हेरवाडकर, ज्ञान प्रबोधन संघ विजयी

Amit Kulkarni

मनपा निवडणुकीला स्थगिती नाहीच

Amit Kulkarni

मध्यान्ह आहार कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ करा

Patil_p

घर झाडण्यासाठी येऊन मंगळसूत्र पळविणाऱया महिलेला अटक

Patil_p

बिम्स प्रशासनाविरुद्ध कर्मचारी संतप्त

Patil_p

दिव्यांग व्यक्तींची बसपास घेण्यासाठी वर्दळ

Patil_p
error: Content is protected !!