तरुण भारत

सांगली : पलूस तालुक्यात पूरबाधितांचे पंचनामे अंतिम टप्यात

प्रतिनिधी / पलूस

पलूस तालुक्यातील पूरबाधितांचे क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्यात आले असून येत्या काही दिवसात कृष्णा नदी काठावरील चोवीस गावांचे पंचनाम्याचे काम पूर्ण होणार आहे. आज अखेर पाच हजार, अठ्ठयाऐंशी हेक्टर शेतजमीनीचे पंचनामे करण्यात आले आहेत. अशी माहिती तहसिलदार निवास ढाणे यांनी दिली. कृष्णाकाठावरील पाच हजार हेक्टर क्षेत्रातील सुमारे १०३७४ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. तर ६६ हजार घरे पाण्यात राहिली होती तर ११०० रांची पडझड झाली आहे.

Advertisements

यामध्ये १५० दुकाने पाण्यात राहिल्याने याचेही पंचनामे करण्यात आले आहेत. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे, पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पलूस तालुक्यातील कृष्णानदीला महापूर आला. या महापूरामध्ये कृष्णाकाठावरील सुमारे चोवीस गावांना याचा जबर फटका बसला. घरे, दुकाने, शेती क्षेत्र पाण्याखाली राहिल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. महापूरादरम्यान पलूस तालुक्यातील बुर्ली, आमणापूर, दुधोंडी, दहयारी, तुपारी, घोगाव, भिलवडी, अंकलखोप, पुणदी, नागठाणे, नागराळे, ब्रम्हनाळ, सुखवाडी, औदुंबर, धनगाव, राडेवाडी सह चोवीस गावांना महापूराचा फटका बसला आहे.

Related Stories

कोल्हापूर विभाग दहावी निकालाचे काम पूर्ण

Abhijeet Shinde

भाजपा महिला मोर्चाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Abhijeet Shinde

अनिल देशमुख यांची भूमिका योग्यच : जयंत पाटील

Abhijeet Shinde

आळसंद ग्रा.पं.शासकीय कामकाज अडथळा प्रकरणी कारवाई करावी – सरपंच

Abhijeet Shinde

सांगली : ९० वर्षांच्या आज्जींना मंत्री जयंत पाटील यांनी दिला धीर

Abhijeet Shinde

सांगली : बहेत मंडळांचा सार्वजनिक गणपती न बसवण्याचा निर्णय, खर्चाचे पैसे ‘या’कार्यासाठी वापरणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!