तरुण भारत

एका चुकीमुळे गमावले 17 लाख फॉलोअर्स

आईने डिलिट केले सोशल मीडियावर अकौंट

सोशल मीडियाच्या स्टारला तिच्या आईनेच दणका दिला आहे. तिच्या आईने स्वतःच्या मुलीचे सोशल मीडिया अकौंटच डिलिट केले आहे. या अकौंटवर 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स असताना तिने हे पाऊल उचलले आहे. आईने स्वतःच्या मुलीचे अकौंट का डिलिट केले याचे अत्यंत मोठे रंजक कारण समोर आले आहे. मुलीची आई तिच्या एका गोष्टीमुळे खूपच नाराज असायची.

Advertisements

ही घटना ब्राझीलच्या एका सोशल मीडिया स्टारसोबत घडली आहे. ब्राझीलमध्ये राणारी 14 वर्षीय सोशल मीडिया स्टार व्हॅलेंटिना अत्यंत लोकप्रिय आहे. इन्स्टाग्राम आणि टिकटॉक यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर तिचे 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

व्हॅलेंटिना दररोज स्वतःच्या अकौंटवर विविध प्रकारच्या पोस्ट करायची. ती स्वतःच्या मित्रांसोबतची छायाचित्रे अपलोड करत होती. व्हॅलेंटिनाची फॅन फॉलोइंग वाढतच गेली होती. पण या सर्व घडामोडींवर तिच्या आईची नजर होती. एक दिवस अचानक तिच्या आईने मोबाइल हातात घेत तिचे इन्स्टाग्राम आणि टिकटॉक अकौंटच डिलिट केले. व्हॅलेंटिना सोशल मीडियावर खूपच अधिक वेळ घालवत होती आणि तिच्या आईला हे पसंत नव्हते. अधिक वेळ वाया जात असल्याने व्हॅलेंटिनाची आई तिच्यावर नाराज झाली होती.

सोशल मीडियावरील अकौंट हटविण्यात आल्याचे कळल्यावर व्हॅलेंटिनाच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. जेव्हा तुम्ही 14 वर्षांचे असता, तेव्हा स्वतःचे जीवन कसे जगावे याचा अंदाज खूपच कमी असतो. व्हॅलेंटिनाचे अकौंट डिलिट केले तरच ती यातून बाहेर पडणार याची जाणीव झाली होती असे तिच्या आईने म्हटले आहे.

Related Stories

तुर्कस्तानच्या किलर ड्रोनवर पाकिस्तानची नजर

Patil_p

कोरोनाची धास्ती : ‘या’ देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन

Rohan_P

पुलवामा हल्ल्याची पाक मंत्र्याकडून कबुली

datta jadhav

चीनला डावलून अमेरिकेसोबत गेलात तर…

datta jadhav

स्वयंचलित कारचा कृष्णवर्णीयांना धोका

Patil_p

म्यानमारमध्ये भूस्खलन; 162 जणांचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!