तरुण भारत

कोव्हॅक्सिन-कोव्हिशिल्डचा मिक्स डोसही परिणामकारक

‘आयसीएमआर’चा दावा – अँटिबॉडीज तयार होण्याच्या दृष्टीने उपयुक्त

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या मिक्स डोसचा परिणाम अधिक चांगला येत असून त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती अधिक चांगली होते असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) संशोधनातून स्पष्ट झाले आहे. दोन वेगवेगळय़ा लसींचे डोस घेणे हे अधिक सुरक्षित आणि शरीरात अँटिबॉडीज तयार होण्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचेही आयसीएमआरने अभ्यासाअंती स्पष्ट केले आहे. मात्र, सध्या दोन वेगवेगळे डोस घेण्यास अंतिम मंजुरी मिळाली नसल्याने लाभार्थींना पुढील काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दोन वेगवेगळय़ा लसींचे डोस घेऊ नका असे यापूर्वी केंद्र सरकारकडून आवाहन करण्यात आले होते. देशातील लसीकरण कार्यक्रमामध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला असताना उपलब्ध असलेल्या दुसऱया कंपनीची लस घेता येईल का अशी चाचपणी सुरु होती. पण त्यावेळी दोन वेगवेगळय़ा लसीचे डोस घेऊ नका, त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता संभवते, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींमधूनही अधिक चांगला परिणाम सिद्ध झाल्याचे दिसून आले आहे. यासंबंधी अजूनही संशोधन सुरू असून, सध्यातरी दोन्ही डोस एकाच लसीचे असतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

आता आयसीएमआरच्या हय़ा संशोधनामुळे दोन वेगवेगळय़ा लसी एकत्रित वापरता येतील असे दिसून आले आहे. जर लसीचा पहिला डोस कोव्हिशिल्डचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा दिला तर? हे फायद्याचे ठरू शकते की घातक? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आता ‘आयसीएमआर’ने स्पष्ट केलेल्या दाव्यामुळे शास्त्रज्ञांसह सर्वसामान्यांच्या मनातील भीती दूर होणार आहे. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींचे प्रत्येकी एक डोस घेतले असता ते अधिक सुरक्षित आहेत आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत अधिक वाढ होईल असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी ‘आयसीएमआर’च्या एका अभ्यासातून कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मृत्यूचा धोका 95 टक्क्मयांपर्यंत कमी होतो, असेही स्पष्ट झाले होते.

अन्य देशांमध्येही मिक्स डोसबाबत संशोधन

अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स आणि इतर काही युरोपीयन देशांनी सध्या ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या लसीच्या डोसनंतर फायझर किंवा मॉडर्नाची लस देण्यास सुरुवात केली आहे, तर स्पेन आणि ब्रिटनमध्ये याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे. ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या डोसनंतर फायझरची लस दिल्यानंतर प्रौढांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचे साईड ईफेक्ट्स आढळून आले होते. मात्र, धोकादायक लक्षणे न आढळल्याने वैद्यकीय यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Stories

आसामच्या नामघरांना मदत, भाजपला लाभ

Patil_p

संयुक्त राष्ट्र प्रमुखांची भारतावर स्तुतीसुमने

Patil_p

लडाखमध्ये चिनी हवाई दलाचा युद्धसराव

datta jadhav

उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 2725 वर

Rohan_P

दिल्ली : दिवसभरात 384 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Rohan_P

भारतात कोरोना रुग्णसंख्या मंदावतेय

datta jadhav
error: Content is protected !!