तरुण भारत

जैश-ए-मोहम्मदकडून नव्या संघटनेची निर्मिती

पाकिस्तानी दहशतवादी संघटनेबद्दल एनआयएचा मोठा खुलासा

वृत्तसंस्था / जम्मू

Advertisements

जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने ऑगस्ट-सप्टेंबर 2020 मध्ये लष्कर-ए-मुस्तफा नावाची नवी दहशतवादी संघटना निर्माण केली होती. हिदायत उल्लाह मलिक उर्फ हसनैन हा याचा म्होरक्या आहे. मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहरच्या भावासमवेत अनेक जैश दहशतवाद्यांशी तो पाकिस्तानी मोबाईल क्रमांकाद्वारे तो संपर्कात होता. एनआयएने आरोपपत्रात हा खुलासा केला आहे. 4 ऑगस्ट रोजी जम्मूच्या विशेष एनआयए न्यायालयात मलिक समवेत लष्कर-ए-मुस्तफाच्या दहशतवाद्यांच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

लष्कर-ए-मुस्तफाच्या स्थापनेनंतर मलिकला जैशच्या दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढविण्याचा निर्देश मिळाला होता. एनआयएने पुलवामा हल्ल्याप्रकरणी अजहर, त्याचे भाऊ आणि नेंगूरवर आरोप ठेवले आहेत. मलिक या दहशतवाद्यांना लष्कर-ए-मुस्तफाच्या प्रगतीविषयी माहिती देत होता.  लष्कर-ए-मुस्तफाची स्थापना जैश-ए-मोहम्मदने एक शाखा म्हणून केली. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबावापासून वाचण्यासाठी ही कृती करण्यात आली होती.

जैश-ए-मोहम्मदने मलिकला निधी उभारणे आणि स्थानिक काश्मिरी युवकांना दहशतवादी संघटनेत भरती करण्यास सांगितले होते. त्याच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये शोपियांमध्ये जम्मू-काश्मीर बँकेच्या मुख्य शाखेतून 60 लाख रुपये लुटले होते. या रकमेचा वापर काश्मीर आणि बिहारमधून शस्त्रास्त्रs मिळविण्यासाठी झाला होता.

डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी

एनआयएने 6 फेब्रुवारी रोजी लष्कर-ए-मुस्तफा आणि त्याच्या म्होरक्या विरोधात जम्मूमध्ये गुन्हा नोंदविला होता. मलिकने जम्मू आणि दिल्लीमध्ये अनेक सुरक्षा प्रतिष्ठानांची रेकी केली होती. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्यालयाभोवती घिरटय़ा घातल्या होत्या.

Related Stories

निर्भया : दोषींची फाशी पुन्हा लांबणीवर

prashant_c

हाथरस येथे पायी निघालेल्या राहुल गांधींना यूपी पोलिसांकडून अटक

Rohan_P

इंधनाचे दर एप्रिलपासून घटणार?

Patil_p

जाट नेत्यांच्या बैठकीत ‘चौधरी’ झाले अमित शाह

Amit Kulkarni

फेनाई, रिगन चेन्नीयन एफसीशी करारबद्ध

Patil_p

अमेरिकेत भारतीय महिलांचे मोठे यश

Patil_p
error: Content is protected !!