तरुण भारत

गुंड अन्वर शेख-टायगरचा खात्मा

रविवारी सोवनूर-कर्नाटक येथे खात्मा : गुंडानीच कुऱहाडीचे घाव घालून जीवंत मारले कर्नाटक-गोव्यातील मोठा गुंड

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

 अपहरण, बलात्कार, खंडणी, गुंडागिरीद्वारे गोव्यात दहशत माजविणारा कुख्यात गुंड अन्वर शेख उर्फ टायगर याचा काल रविवारी सोवनूर-कर्नाटक, हावेरी जिल्हा येथे खात्मा करण्यात आला. बबलू नामक व्यक्तीने अन्वर शेख याच्यावर कुऱहाडीचे घाव घालून त्याला जीवंत मारले. या वृत्ताला दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग तसेच उपअधीक्षक हरिष मडकईकर यांनी दुजोरा दिला आहे.

 अन्वर शेख उर्फ टायगर याच्यावर गोव्यातील कोलवा, मडगाव, फातोर्डा, कुडचडे इत्यादी पोलीस स्थानकावर अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत व तो पोलिसांना हवा होता. अन्वर शेख उर्फ टायगर हा मुळचा सोवनूर-कर्नाटक येथील होता. गोव्यात हाऊसिंग बोर्ड मडगाव व नंतर चंद्रवाडो-फातोर्डा येथे त्याचा मुक्काम होता. गोव्यात गुन्हे केल्यानंतर तो कर्नाटकात धारवाड, सोवनूर, शिर्शी इत्यादी भागात लपून बसायचा, असा त्याचा पोलिसी दस्तऐवजातील इतिहास आहे.

 कुऱहाडीचे घाव घालून अन्वरचा खून

 अन्वर शेख उर्फ टायगर याच्यावर काल रविवारी बबलू नामक व्यक्तीने कुऱहाडीचे घाव घातले. कुऱहाडीचे घाव अन्वरच्या डोक्यावर, कानावर, तोंडावर पडल्याने तो जागीच ठार झाला. अन्वरचा खून केल्याची माहिती मिळताच सोवनूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला. बबलूने अन्वरचा खून नेमका कोणत्या कारणासाठी केला याची सविस्तर माहिती काल उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. मात्र, दुष्मनीतून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फातोडर्य़ात झाला होता खुनी हल्ला

अन्वर शेख याच्यावर 16 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारच्यावेळी आर्लेम जंक्शनजवळ खूनी हल्ला झाला होता. त्यावेळी पोलीस अधीक्षक सेमी तावारीस हे घटनास्थळी पोचल्यानेच अन्वर बचावला होता. मात्र, शेवटी सात महिन्यांनी त्याचा सोवनूर कर्नाटकात खून करण्यात आला. फातोर्डा येथे अन्वरवर झालेला खुनी हल्ला हा बेकायदा वाळू उत्खनन आणि मादक पदार्थांच्या व्यवहारातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

 कट रचून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप

या खुनी हल्ला प्रकरणासंबंधी मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने या प्रकरणातील एकूण 6 संशयित आरोपीविरुद्ध कट कारस्थान रचून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपासंबंधी आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता. या खटल्याची सुनावणी सुरू होण्यापूर्वीच अन्वरचा खून करण्यात आला. या प्रकरणात रिकी होर्णेकर, इम्रान बेपारी, हर्षवर्धन सावळ, सुदन दा कॉश्ता, व्हॅली द कॉश्ता आणि वसंत उर्फ अमीर गवंडे या सहा जणाविरुद्ध कट कारस्थान रचून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपासंदर्भात आरोप निश्चित करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होत. संशयित व्हॅली डिकॉश्ता याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याखालीही आरोप निश्चित करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला होता.

केपेतील महिलेचे अपहरण व बलात्कार

केपे येथील एका महिलेचे अन्वर शेख उर्फ टायगर याने मे 2019 मध्ये अपहरण करून तिला धारवाड-कर्नाटक येथे नेले होते. तिथे या महिलेला जवळपास सहा महिने एका खोलीत डांबून ठेवले होते. तिच्यावर अन्वर शेख उर्फ टायगर तसेच त्याच्या तीन साथीदारांनी बलात्कार केला होता. या प्रकरणात 15 नोव्हेंबर 2019 रोजी पोलिसांनी अन्वरच्या तीन साथीदारांना अटक केली होती. त्यावेळी अन्वर हा धारवाड व सौंदत्ती येथे लपून बसत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गोवा पोलिसांनी धारवाड येथे एका हॉटेलवर छापा मारून अन्वरला अटक केली होती.

अन्वर हा त्यानतंर कोलवाळ तुरूंगात होता. तुरूंगातसुद्धा त्याने आपली गँग तयार केली होती. तुरूंगात सुद्धा तो इतर कैद्यांना छळत होता व त्यासदंर्भातील व्हिडिओ व्हायरल झाले होते. कोविड-19च्या काळात तो पॅरोलवर सुटला होता. परंतु, त्याच्या वागण्यात कोणताच बदल झाला नव्हता. फातोर्डा येथे खुनी हल्ल्यात तो जबर जखमी झाला होता. त्याच्यावर गोमेकॉत उपचार करण्यात आले होते व त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. नंतर तो कर्नाटकात गेला व तेथेच त्याचा खात्मा करण्यात आला.

Related Stories

केपेतून भाजपचे बाबू कवळेकर, आरजीचे विशाल देसाई यांचे अर्ज

Patil_p

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिवस म्हणून साजरी

Amit Kulkarni

जुवारी पुलाची एक लेन चालू करणे अशक्मयप्राय

Amit Kulkarni

‘त्या’ दोन्ही मंत्र्यांना डच्चू द्यावा

Omkar B

भाजप कार्यकर्त्यांनी जनतेला योग्य मार्गदर्शन करावे

Patil_p

साळगाव मतदारसंघात केदार नाईक यांचा प्रचार सुरू

Amit Kulkarni
error: Content is protected !!