तरुण भारत

महाराष्ट्र : मंदिरांसह हॉटेलांबाबतचा निर्णय आज शक्य

मुख्यमंत्री ठाकरे यांची माहिती, टास्कफोर्सच्या बैठकीत होणार निर्णय, मुंबईकरांना मोठा दिलासा
15 ऑगस्टपासून लोकल सुरु, दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा

प्रतिनिधी / मुंबई

Advertisements

मुंबईत 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास सुरु होणार असून दोन डोस घेतलेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. दरम्यान, सोमवारी होणाऱ्या टास्क फोर्ससोबतच्या बैठकीत मंदिर आणि प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली होण्याबाबतचा निर्णय होईल, असे ठाकरे यांनी सांगितले आहे. यामुळे साधारण गत दोन वर्षे बंद असलेली मंदिरे आता सुरु होण्याच्या आशा राज्यातील भाविकांतून पल्लवीत झाल्या आहेत.

मुख्यमंत्री खुप दिवसानंतर राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्याने नेमके काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुरुवातीला ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळविणाऱ्या निरज चोप्राचे अभिनंदन केले.

महापूर संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार

एकीकडे कोविडचे संकट असताना दुसरीकडे आता नैसिर्गक संकट येत आहे आता हे दरवर्षीचे झाले आहे, मात्र पुराचा धोक्याचा इशारा आल्यानंतर शासकीय यंत्रणेने साडे चार लाख लोकांचे स्थलांतर केल्याने त्यांचे कौतुक केले पाहिजे, मी पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पॅकेजची घेषणा करणार नाही, असे बोललो होतो तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगताना मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 11 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. महापूर येण्याचे आणि दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. आता अशीच संकट जागतिक तापमान वाढीमुळे येणार असतील हिमनग वितळून जर पाण्याची पातळी वाढणार असेल तर कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे. असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्राने मराठा आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल करावी

मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाही पेंद्रालाच आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्यामुळे पेंद्र सरकारने आरक्षण द्यावं किंवा 50 टक्क्यांची अट शिथिल करुन राज्यांना आरक्षणाचे अधिकार द्यावे, अशी विनंती केली होती. पेंद्र सरकार आता राज्य सरकारला याबबतचा अधिकार देणार आहे. तसेच 50 टक्क्यांची अट शिथिल करुन द्यावी, आम्ही ज्यांवा आवश्यक आहे त्यांना आरक्षण देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबतची अट काढतील, असा मला विश्वास आहे. असे ठाकरे म्हणाले.

तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज

कोविड काही जात नाही, मात्र हा संसर्ग थोपवायचा असेल तर लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार तसेच जोपर्यंत लसीकरण एका टप्पयावर होत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.

काही टिकाणी धोका कायम

पूर आलेल्या जिह्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा कोल्हापूर, सांगली या भागात पूर येण्याआधी कोरोना रुग्ण संख्येत वाढ होती आजही या ठिकाणी निर्बंध कायम असून लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकारण करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका

कोरोनाचे संकट थोपविण्यासाठी आपण जो संयम दाखविला त्यामुळे आपला पॅटर्न देशात गाजला, देशातील सगळ्यात चांगला मुख्यमंत्री म्हणून जरी माझे कौतुक झाले असले तरी हे श्रेय आपले आहे, कारण आपण मी सांगतो ते ऐकत आहात त्यासाठी आपले कौतुक मात्र भडकवणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

  ठाकरे यांनी सांगितलेले इतर महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे….

  • सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांसह पुणे, अहमदनगर बीडमध्ये अजुनही काळजी घेण्याची गरज
  • स्थानिक प्रशासनाची जबाबदारी मोठी
  • अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद
  • साडेचार लाख नागरिकांचे वेळीच स्थलांतर
  • तिसरी लाट आल्यास आढावा घेऊन उपाययोजना केल्यला जातील
  • मुंबईत जिनोम सिक्वेन्सिंग लॅब, राज्यातील इतर जिल्ह्यांना होणार मदत. मुंबई महानगर पालिका देशातील पहिली मनपा

पुण्यातील दुकाने, हॉटेल्स रात्रीपर्यंत खुली

मॉल्सही उघडणार, अजित पवार यांची घोषणा

प्रतिनिधी / पुणे

पुण्यातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर हॉटेल-बारही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रविवारी हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

 दुकानाच्या वेळा बदलण्याबाबत प्रशासनाकडे पुणे व्यापारी महासंघाने मागणी केली होती. यासाठी आंदोलनही करण्यात आले. व्यापारी महासंघाने यासाठी अल्टीमेटमही दिला होता. विरोधी पक्षानेही सवलतीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी हा निर्णय घेतला.

दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टीनुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील, तर दुकाने, हॉटेल-बार पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली, शनिवारी-रविवारी दुकाने तसेच हॉटेल्स दुपारी चारपर्यंत खुली राहतील. परंतु, पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के झाल्यास पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.

पुण्यातील सर्व उद्याने नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहेत. जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी दिली जाणार आहे. पुणे ग्रामीणमध्ये अद्यापही पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे. त्यामुळे तिथे लेव्हल तीनचे नियम लागू असणार आहेत. त्यामुळे या भागातील दुकाने, आस्थापने दुपारी 4 पर्यंतच सुरु राहतील तसेच हॉटेल, रेस्टॉरंटही दुपारी 4 पर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे.

Related Stories

मद्य दुकानांसमोर तळीरामांची मोठी गर्दी

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृत्यूंमध्ये वाढ, नव्या रूग्णांत घट, 20 मृत्यू

Abhijeet Shinde

नारायण राणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Abhijeet Shinde

संक्रमित रुग्णांमध्ये किंचित घट

datta jadhav

आता घरबसल्या मिळतोय ‘सातबारा’

NIKHIL_N

पुणे मिनी लॉकडाऊनला भाजपचा विरोध

Rohan_P
error: Content is protected !!