तरुण भारत

१६ ऑगस्टपासून ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया


मुंबई \ ऑनलाईन टीम

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे ,पिंपरी-चिंचवड नाशिक ,अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

सदर प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी सुलभ व्हावी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विद्यार्थी नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठीची सुविधा 16 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येईल. 13 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना सरावासाठी संकेतस्थळावर मोफत रजिस्ट्रेशन म्हणजे तात्पुरते प्रारूप नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

Advertisements

सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भागात विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती त्यासोबत शुल्क भरुन अर्ज लॉक करायचा आहे. सीईटी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सीईटीचे गुण आणि पसंती क्रमांक यासाठी अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे. त्याच वेळापत्रक काही दिवसांमध्ये संकेतस्थलावर जाहीक करण्यात येईल.

मुंबई खालोखाल पुणे विभागातून १ लाख ३२ हजार २५५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. तर २ हजार ७३४ अर्ज जुन्या विद्यार्थ्यांचे आहेत. राज्य मंडळाकडून आता परीक्षेच्या आयोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Related Stories

लालपरीला पहिल्या दिवशी प्रवाशांचा थंडा प्रतिसाद

Patil_p

हेलिकॉप्टरचा व्हिडिओ घेणाऱ्यांच्या फोनची तपासणी

Sumit Tambekar

‘त्या’ दहशतवाद्यांच्या अटकेनंतर मध्यप्रदेशात रेड अलर्ट

datta jadhav

सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी द्यायचा का?

Abhijeet Shinde

श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्र विकासासाठी 28.48 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Rohan_P

सोन्याची तस्करी करणाऱया तीन महिलांना मुंबई विमानतळावरून घेतले ताब्यात

Rohan_P
error: Content is protected !!