तरुण भारत

गुणवत्तेच्या आधारावर सैन्यप्रमुखांची नियुक्ती?

ज्येष्ठत्वाचा निकष दूर होणार- संरक्षण मंत्रालयाकडून होतोय विचार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

संरक्षण मंत्रालय भूदल, नौदल आणि वायुदलाच्या कमांडर इन चीफच्या नियुक्तीशी संबंधित एका प्रस्तावाची समीक्षा करत आहे. हा प्रस्ताव संमत झाल्यास संरक्षणदलांच्या सर्वोच्च कमांडरांच्या नियुक्ती क्रांतिकारक बदल येऊ शकतो. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास संरक्षण दलांच्या प्रमुखांची निवड ज्येष्ठत्वाऐवजी गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे.

समिती स्थापन करणार

या प्रस्तावाचा उद्देश सैन्यात सैन्यात लेफ्टनंट जनरल, नौदलात व्हाइस ऍडमिरल आणि वायुदलात एअर मार्शल यासारख्या थ्री स्टार अधिकारी आणि कमांडर इन चीफ्सच्या पदोन्नतीसाठी एक प्रगतिशील, संयुक्त आणि गुणवत्ता आधारित धोरण करणे आहे. या प्रस्तावाचे अध्ययन आणि संरक्षण दलांच्या प्रमुखांच्या निवडीसाठी गुणवत्ता आधारित नियम निश्चित करण्यावरून सूचना देण्यासाठी सैन्य, नौदल आणि वायुदलाच्या उपप्रमुखांची एक तीन सदस्यीय समिती स्थापन केली जाऊ शकते. पण संरक्षण दलांमध्ये या प्रस्तावावरून अनेक गंभीर चिंता व्यक्त होत आहेत. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास संरक्षण दलाच्या सर्वोच्च पदांचे राजकीयकरण होऊ शकते असे म्हटले जात आहे.

भीती व्यक्त

थ्री स्टार पातळीपर्यंत मोजके अधिकारी पोहोचतात, त्यांचेही कारकीर्दीत प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेच्या आधारावर मूल्यांकन करण्यात येते. अशा स्थितीत दशकांपासून मान्य असलेल्या धोरणात बदल करणे चुकीचे ठरू शकते. कथित ‘डीप सिलेक्शन’मुळे अनावश्यक स्वरुपात संरक्षणदलाच्या सर्वोच्च पदांचे राजकीयकरण होणार असल्याची भीती एका वरिष्ठ अधिकाऱयाने व्यक्त केली आहे.

गुणवत्तेचा मुद्दा

धोरणात बदल करण्याचे समर्थक मात्र ज्येष्ठत्व नव्हे तर गुणवत्तेचा मुद्दा उचलून  धरत आहेत. संरक्षण दलांच्या सर्वोच्च पदावर निवड होण्यासाठी ज्येष्ठत्व असण्यासह गुणवत्ता असणेही आवश्यक आहे. संरक्षण दलांमध्ये उत्तम सामंजस्य राखण्यासाठी देश त्रि-सेवा थिएटर कमांड आणि संघटनेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.

सद्यकाळातील नियमांनुसार कमांडर इन चीफ पातळीवर पदोन्नतीसाठी अधिकाऱयाची जन्मतारीख आणि सैन्यातील कमिशन (सेवाप्रारंभ)च्या तारखेला प्राधान्य दिले जाते. हा नियम 4 दशकांपासून लागू आहे. या नियमाबरोबरच सैन्यात एका अधिकाऱयाकडे 14 कोरपैकी एकाला कमांड करण्यासाठी लेफ्टनंट-जनरलच्या स्वरुपात त्याच्या मंजुरीच्या तारखेपपासून 3 वर्षांचा सेवाकाळ शिल्लक असणे आवश्यक आहे. तर कोरला कमांड केल्यावर अधिकाऱयाकडे  कमांडर इन चीफच्या स्वरुपात पदोन्नती मिळविण्यासाठी 18 महिन्यांचा सेवाकाळ असणे गरजेचे आहे. नौदल आणि वायुदलात कमांडर इन चीफसाठी हा कालावधी 12 महिन्यांचा आहे. वर्तमान धोरणात अधिकाऱयाला जन्मतारीख, रेसिडय़ुल सर्व्हिस आणि कमिशनमधील ज्येष्ठत्व पाहून पदोन्नती मिळते. तर लेफ्टनंट जनरलला कमांडर इन चीफच्या स्वरुपात पदोन्नती रिक्ततेच्या आधारावर प्राप्त होते.

Related Stories

आता गावांनीही स्वावलंबी व्हावे!

Patil_p

पंजाबमधील कोरोना रुग्णांनी पार केला 90 हजारांचा टप्पा

Rohan_P

बेंगळूरमध्ये दिसलं सूर्याचं प्रभामंडळ

datta jadhav

तिहार तुरुंगात कैद्याची आत्महत्या

Patil_p

जगभरात 4.5 लाखांहून अधिक कोरोनाबळी

datta jadhav

अनंतनागमध्ये 6 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

datta jadhav
error: Content is protected !!