तरुण भारत

‘प्राईम डे’ला सर्व वर्गवारीमध्ये प्राईम सदस्यांचा प्रतिसाद

वृत्तसंस्था / मुंबई

प्राईम डे 2021 ने ऍमेझॉन. इन वर बऱयाच लघु मध्यम व्यवसाय (एसएमबीएस) ला चिन्हांकीत केले, कारण त्यांना प्राईम सदस्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. भारतामधील 96 टक्के पिनकोडमधील ग्राहकांनी ऑर्डर देण्यासह आणि लिडींग अपपासून ‘प्राईम डे’ पर्यंत सर्वात जास्त जणांनी प्राईम व्हिडीयोला प्रतिसाद देण्यासह आणि प्राईम म्युझिक सर्वात जास्त संख्येने ऐकण्यासह प्राईम सदस्यांनी या ‘प्राईम डे’ ला निराळय़ा एसएमबी निवडी, नवीन सुरूवात, उत्तम बचत आणि विविध प्राईम लाभ यांसह उत्तम ऑफर्सचा आनंद घेतला.

Advertisements

लीड अप दरम्यान आणि ‘प्राईम डे’ला, कारागीर, विणकर, महिला उद्योजक, उदयोन्मुख व्यावसायिक आणि ब्रॅण्ड्स, स्थानिक ऑफलाईन शेजारील दुकाने यांसह 126,003 विपेत्यांकडून प्राईम सदस्यांनी खरेदी केली. यामध्ये बर्नाला (पंजाब), चंफाई (मिझोराम), विरूधुनगर (तामिळनाडू), गुंटूर (आंध्र प्रदेश), वालसाड (गुजरात), शाजापुर (मध्य प्रदेश) यांसारख्या टायर 2-3-4 शहरांमधील विपेत्यांचा समावेश होता. 31,230 विपेत्यांनी एकाच दिवशी सर्वात जास्त विक्री बघितली आणि जवळपास 25 टक्केहून अधिक विपेत्यांनी मागील ‘प्राईम डे’ च्या तुलनेत 1 कोटी रूपयांची विक्री केली. प्राईम डे सर्व आकारांच्या ब्रॅण्ड्ससाठी नवीन उत्पादनांची सुरूवात करण्यासाठी निराळी संधी देतो, अशी माहिती या वेळी देण्यात आली.  

सदस्यांना 300 सर्वोत्कृष्ट भारतीय आणि जागतिक ब्रॅण्ड्समधील नवीन सुरूवात झालेली उत्पादने आवडली. प्राईम सदस्यांना वनप्लस नॉर्ड 2 5जी, सॅमसंग गॅलक्सी (एम 31 एस) बोट एयरडोप्स, एमआय 3 आय 20000 एमएएच पॉवर बँक, पिजन मिनी हँडी आणि कॉम्पॅक्ट चॉपर यांसारखे ब्रॅण्ड्स आवडले. सर्वोत्कृष्ट 10 शहरांच्या बाहेरील भागांमधून 70 टक्केहून अधिक नवीन प्राईम सदस्यांनी खरेदी केली जसेकी अनंतनाग (जम्मू आणि काश्मिर), बोकारो (झारखंड), तवांग (अरूणाचल प्रदेश), मोकोकचंग (नागालँड), होशियारपूर (पंजाब), निलगिरीज (तामिळनाडू), गदग (कर्नाटक) आणि कासरगोड (केरळ).

 ऍमेझॉन इंडियाचे प्राईम आणि फुलफिल्मेंट एक्सपिरियंसचे संचालक अक्षय साही म्हणाले, “आम्ही हा प्राईम डे एसएमबी आणि स्थानिक दुकाने यांना समर्पित केला आणि त्यांच्या सहभागाने आम्हाला आनंद वाटला. प्राईम सदस्यांनी 126,000 हून अधिक एसएमबीमधून खरेदी केली आणि 6,800+ पिन कोडमधील दुकानांमधून खरेदी केली, जी ‘ए डॉट इन’ वरील लघु मध्यम व्यवसाय (एसएमबीएस) साठीची सर्वात मोठी विक्री ठरली. लिडींग अप ते प्राईम डे चा महिना प्राईम व्हिडीयोचा सर्वात मोठा प्रेक्षक कालावधी ठरला, भारताला प्राईम ऑफर देत असलेली मोफत, जलद शिपींग, आकर्षक खरेदी आणि डिजीटल लाभ  आवडतात हे यातून सिद्ध झाले.’’

Related Stories

एस्सार पॉवर लिमिटेडचा ऊर्जा प्रकल्प

Amit Kulkarni

शेअर बाजारात पुन्हा घसरणीची नोंद

Patil_p

केयर्न ऑईलमधील 20 टक्के हिस्सेदारी वेदान्ता विकणार

Patil_p

कच्च्या तेलाच्या उत्पादनात जुलैमध्ये घट

Patil_p

दोन सत्रांच्या तेजीला विराम !

Patil_p

‘वाडीलाल’चे 800 कोटींचे विक्रीचे उद्दिष्ट

Patil_p
error: Content is protected !!