तरुण भारत

जी. एम. वांग्यांचे सामाजिक-आर्थिक परिणाम

बांगलादेश आणि फिलिपाईन्स या दोन आशियाई देशांमध्ये बी.टी. (बॅसिलस थुरिंगेनसीस) वांग्याचे उत्पादन, प्रक्रिया आणि पणन व्यवहार होतात. आशियाई देशांमध्ये जागतिक उत्पादनाच्या 87 टक्के वांग्याचे उत्पादन होते. बांगलादेश व फिलिपाईन्ससह इतर आठ देशांमध्ये वांग्याचे उत्पादन होते. चीनचा पहिला क्रमांक आणि भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. फिलिपाईन्स देशामध्ये बी.टी. वांग्याच्या सामाजिक-आर्थिक परिणामाची चर्चा व संशोधन यावर जगभर चर्चा चालू आहे. त्यासंबंधीचा अहवाल प्रस्तुत लेखामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. वांग्याचे सेवन आरोग्याच्यादृष्टीने खूप उपयुक्त आहे. त्याचे उत्पादन, उत्पादनाचा खर्च, पर्यावरणीय प्रश्न, शेतकऱयांच्यादृष्टीने होणारे फायदे, वांग्यावर पडणाऱया रोगावरील नियंत्रण, वांग्याची चव, स्वाद, सत्त्व आणि तिचा निर्यात व्यवहार यासंबंधीची चर्चा या निमित्ताने महत्त्वाची ठरते.

पारंपरिक वांग्याच्या वाणाच्या अनेक कमकुवत बाजू आहेत. विशेषतः त्यावर पडणारे रोग ही बाब शेतकऱयांच्यादृष्टीने चिंतेची बाब असते. बी.टी. तंत्रज्ञानामध्ये वांग्यावर पडणारे नेहमीचे जे रोग असतात, त्यावर पूर्णतः नियंत्रण प्रस्थापित केले जाते. त्याच्या डीएनए, आरएनएआयमध्ये तसे बदल केलेले असतात. वेगवेगळय़ा पातळीवर त्याची चाचणी केलेली असते. विशेषतः डीएनएतील बोरर नावाच्या रोगाच्या अस्तित्वाचे अध्ययन (जेन एडिट) करून तो भाग काढून हवा तो अनुकूल भाग डीएनएला जोडला जातो. त्यासाठी क्रिस्पर कॅस-9 च्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे बी.टी. तंत्रज्ञान अनेक बाबतीत सुरक्षित असल्याचा दावा केला जातो.

Advertisements

वांग्यावर पडणाऱया रोगावर पूर्वनियंत्रित केल्यामुळे वांग्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्याच्या उत्पादनाचा खर्च कमी झाला आहे. विषारी आणि घातक औषध फवारण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते. औषधावरचा खर्च वाचतो. शेतकऱयांना त्यामुळे लाभ होतो. ग्राहकांना हव्या त्या गुणवत्तेची वांगी उपलब्ध होतात. भारतामध्ये बी.टी. वांग्यांना परवानगी नाही. बी.टी. वांग्याची बियाणे, त्याचे उत्पादन आणि पणन व्यवहार यावर बंदी आहे. पण भारताच्या सीमेजवळील बांगलादेशच्या जिल्हय़ामध्ये बी.टी. वांग्याचे खूप उत्पादन होते. त्यामुळे बी.टी. वांग्याचे बियाणे भारतात येऊ शकतात. अशा बेकायदेशीर एचटीबीटी बियाणांची लागवड भारतात होऊ शकते. त्याचा शोध घेणेसुद्धा अवघड आहे. अनेक देशांमध्ये बी.टी. बियाणांचा उपयोग होत आहे.

फिलिपाईन्समध्ये बी.टी. वांग्याच्या उत्पादनामध्ये 17 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. काही भागात ही वाढ 18 टक्क्मयांच्या वर आहे. एकूण लागवड क्षेत्रामध्ये अडीच टक्क्मयांची वाढ झालेली आहे. अशीच स्थिती बांगलादेशामध्ये पहायला मिळते. बांगलादेशात सरासरी 50 हजार हेक्टरवर 34,500 शेतकरी वांग्याची लागवड करतात. बी.टी. वांग्याच्या चार वाणांची (बी.टी. उत्तरा, बी.टी. काजला, बी.टी. नयनतारा आणि बी.टी. आयएसडी-006) लागवड बांगलादेशात होते.

वांग्याची शेतीवरील सरासरी प्रतिकिलो किंमत फिलिपाईन्स पेसो 14.36 इतकी आहे. म्हणजे भारतीय रुपयामध्ये हा दर रु. 21.25 इतका आहे. घाऊक दर 20 पेसोच्या वर आहे आणि किरकोळ किंमत 35 पेसोच्या दरम्यान आहे. म्हणजे भारतीय रुपयामध्ये प्रति किलो वांग्याची सरासरी किंमत रु. 52 च्या दरम्यान आहे. बांगलादेशामध्ये प्रतिकिलो वांग्याची किंमत 100 टकापर्यंत आहे. म्हणजे भारतीय रुपयामध्ये हा दर प्रतिकिलो 88 रुपयांपर्यंत आहे. वांगी उत्पादनामध्ये बांगलोदशाचा तिसरा क्रमांक लागतो.

वांग्याच्या उत्पादनामध्ये वाढ आणि उत्पादन खर्चामध्ये सुमारे 48 टक्के घट यामुळे शेतकऱयांना याचा लाभ झालेला दिसतो. तसेच पर्यावरणीयदृष्टय़ा विषारी व घातक औषध फवारणी कमी झाली असून फवारणीच्या अनेक फेऱया कमी झाल्या. त्यामुळे पर्यावरणीय व आरोग्याच्यादृष्टीने बी.टी. वांगी फायदेशीर असल्याचा अहवाल (फिलिपाईन्स आणि बांगलादेश) सांगतो. शेतकऱयांच्या वर्षभरातील अभ्यासावरून तज्ञांनी ही माहिती संकलित केली आहे. खतांच्या वापरामध्ये देखील घट झालेली आढळते. श्रमावरचा खर्च पारंपरिक वांग्याच्या लागवडीच्या तुलनेने फक्त 1/3 खर्च श्रमावर झालेला दिसतो.

उपाभोक्त्यांच्या पाहणीवरून ग्राहकांचे समाधान झाल्याचे आढळते. बी.टी. वांग्याच्या उपभोगाला अनेकदृष्टीने ग्राहकांनी पाठिंबा दिलेला दिसतो. त्यांच्या आरोग्याचासुद्धा पाहणी अहवाल खूप अनुकूल असल्याचे निदर्शनास आले आहे. पर्यावरणीय परिणामाचा अभ्यास करताना मानवी आरोग्य, उपयुक्त सूक्ष्मजीवावर होणारे परिणाम, शेतीतील पशुधन, पक्षी यांच्यावरच्या परिणामाचा अभ्यास होतो. अल्पकालीन परिणाम मात्र अनुकूल दिसत असले तरी दीर्घकालीन परिणामांची संभाव्यता तपासणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत मात्र दोन्ही देशातील अभ्यासामध्ये बी.टी. तंत्रज्ञानाची वांगी खूपच उपयुक्त असल्याचे निदर्शनास आले
आहे.

भारतातील सध्याची स्थिती संशोधनाची आणि धोरणाच्या प्रक्रियेत अडकलेली आहे. वांग्याच्या दोन वाणांवर सात राज्यांमध्ये संशोधन चालू आहे. मोहरी, गोल्डन राईस आणि इतर काही पिकांच्या बाबतीत संशोधन चालू आहे. जगातील अनेक राष्ट्रांनी वेगवेगळय़ा पिकांवर संशोधन करून बी. टी. तंत्रज्ञानाला परवानगी दिलेली आहे. बी.टी. तंत्रज्ञानाला अनुकूल अशी चार पिके आहेत. (सोयाबीन, कापूस, मका आणि मोहरी). यापैकी फक्त कपाशीला भारतात परवानगी आहे. बी.टी. कापसाची आठवी नवी वाण बाजारात आहे. त्यावर संशोधन चालूच आहे.

डॉ. वसंतराव जुगळे- 9422040684

Related Stories

नवे वर्ष-नवी आव्हाने

Patil_p

कृष्णावर सत्राजिताचा आरोप

Patil_p

मोठय़ा शक्तीसह येते मोठी जबाबदारी

Patil_p

अनिरुद्ध व रोचन यांचा विवाह

Patil_p

तुझें यथोचित भाषण

Omkar B

दंतकथा

Patil_p
error: Content is protected !!