तरुण भारत

कोल्हापुरात तीन महिन्यांनंतर सक्रीय रूग्णसंख्या 5 हजारांखाली

कोरोना मृत्यूंत वाढ, नव्या रूग्णांत घट

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 10 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 401 नवे रूग्ण आढळले, तर 801 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 4 हजार 885 झाली आहे. कोरोना मृत्यूंत वाढ झाली आहे. पण नव्या रूग्णांत घट झाली आहे. तीन महिन्यांनंतर सक्रीय रूग्णसंख्या 5 हजारांच्या खाली आली आहे. शहरात प्रथमच नवी रूग्णसंख्या पन्नासच्या आत आली आहे. भुदरगड तालुक्यात नवीन रूग्ण नोंद शुन्य राहिली.

Advertisements

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने 10 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत कोरोना बळींची संख्या 5 हजार 567 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 975, नगरपालिका क्षेत्रात 798, शहरात 1 हजार 209 तर अन्य 585 आहेत. दिवसभरात 801 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 88 हजार 132 झाली आहे. गेल्या 24 तासांत 401 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 7, भुदरगड 0, चंदगड 10, गडहिंग्लज 19, गगनबावडा 1, हातकणंगले 43, कागल 25, करवीर 81, पन्हाळा 34, राधानगरी 1, शाहूवाडी 37, शिरोळ 31, नगरपालिका क्षेत्रात 56, कोल्हापुरात 46 तर अन्य 10 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 98 हजार 584 झाली आहे.

कोल्हापूर शहरातील दोघांचा कोरोनाने मृत्यू

परजिल्ह्यातील एकाही मृत्यूची नोंद दिवसभरात झाली नाही. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा आणि सोमवार पेठ येथील व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरात 46 नवे रूग्ण दिसून आले. शहरात कोरोना मृत्यू, नवी रूग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

कोरोना रूग्ण : 493 एकूण : 1,98,183
कोरोनामुक्त : 776 एकूण : 1,87,331
कोरोना मृत्यू : 7 एकूण मृत्यू : 5557
सक्रीय रूग्ण : 5295

Related Stories

गांधीनगरात काढला उंटावरून धडक मोर्चा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कौमार्य चाचणीत अपयश, दोघी बहिणींना पाठवले माहेरी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गोकुळ, जिल्हा बँकेसाठी नव्याने ठराव

Abhijeet Shinde

विश्वनाथ वसंत पुजारी यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान

Abhijeet Shinde

पाचगांव ते कंदलगाव रस्ता करताना कामात देव शोधण्याची गरज

Abhijeet Shinde

जिल्हय़ातील वाडय़ा-वस्त्या येणार ‘महसूल’च्या रेकॉर्डवर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!