तरुण भारत

झायडस कॅडिलाची लस मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

झायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधक लसीला लवकरच आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची चिन्हे आहेत. ही लस मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतर भारतात वापरली जाणारी ही सहावी लस ठरणार आहे. तसेच भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेला आणखी गती येऊ शकते. झायडस कॅडिलाची लस 12 ते 18 वयोगटातील मुलांनाही वापरली जाणार असून अहमदाबाद येथे त्याची निर्मिती करण्यात आली आहे. चाचणीमध्ये या लसीची परिणामकारकता 77 टक्क्मयांपर्यंत नोंदवली गेली आहे. आतापर्यंत भारतात एकूण 5 लसींना मंजुरी देण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत 50 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

Advertisements

Related Stories

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी नौसेनेची मेडिकल टीम मैदानात

datta jadhav

भारतात लवकरच NASAL व्हॅक्सिनची निर्मिती

datta jadhav

कर्तव्य पालनातून घडवा नवा भारत

Patil_p

मराठा आरक्षण : भाजपाने सत्ता असताना आवश्यक ती पुर्तता केली असती तर आज ही परस्थिती नसती : आ. अरुण लाड

Abhijeet Shinde

आम आदमी पक्षाला ईडीची नोटीस

Patil_p

पंजाबमधील कोरोना : मागील 24 तासात 5039 रूग्णांना डिस्चार्ज!

Rohan_P
error: Content is protected !!