तरुण भारत

पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी नव्याने तयारी करेन

भारतीय मुष्टियोद्धा लोवलिना बोर्गोहेन हिचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

टोकियोत ऑलिम्पिक पदार्पणात पदक जिंकले, हे भारतीय मुष्टियोद्धा लोवलिना बोर्गोहेन हिच्यासाठी ‘आयसिंग ऑन द केक’ होते. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यश खेचून आणल्यानंतर आता 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी नव्याने तयारी करण्याचा तिचा मानस आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी मी माझ्या खेळाच्या सर्व बाजूंवर नव्याने परिश्रम घेईन, असे ती म्हणाली. बोर्गोहेन टोकियो ऑलिम्पिकमध्ये 69 किलोग्रॅम वेल्टरवेट वजनगटात कांस्यपदकाची मानकरी ठरली आहे.

आसामच्या गोलघाट जिल्हय़ातील बारो मुखिया या खेडय़ातील रहिवासी असणारी 23 वर्षीय लोवलिना ही ऑलिम्पिक पोडियमवर पोहोचणारी फक्त तिसरी भारतीय मुष्टियोद्धा आहे. सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोम व विजेंदर सिंग यांनाच यापूर्वी अशी कामगिरी करता आली आहे.

‘मागील 8 वर्षांपासून मी सातत्याने घरापासून, कुटुंबापासून दूर राहिले असून हा मी केलेला पहिला त्याग आहे. अगदी माझ्या कुटुंबाला काही अडचण आली तरी मी त्यांच्या मदतीला जाऊ शकली नाही. केवळ दुरुन पाहत राहणे, याशिवाय माझ्या हाती काहीही नव्हते. सराव अर्ध्यावर सोडून घरी जाणे त्यावेळी उचित ठरले नसते आणि हे 8 वर्षे असेच चालत राहिले’, असे लोवलिना याप्रसंगी म्हणाली.

तुर्कीची विद्यमान वर्ल्ड व ऑलिम्पिक चॅम्पियन बुसेनाझ सुर्मेनेली हिच्याविरुद्ध उपांत्य लढतीत पराभव पत्करावा लागला, त्यावेळी पंच बिनचूक असले तरी ताकद कमी पडली का, या प्रश्नावर तिने नकारार्थी उत्तर दिले. ‘ताकदीशी काहीही प्रश्न नव्हता. ऑलिम्पिकपूर्वी 4 वर्षांच्या कालावधीत केवळ चारच महिने कंडिशनिंगवर काम झाले. ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च व्यासपीठावर उतरण्यापूर्वी पूर्ण 4 वर्षे तयारी महत्त्वाची असते’, असे ती येथे म्हणाली.

बोर्गोहेनने उपांत्यपूर्व फेरीत माजी वर्ल्ड चॅम्पियन निएन-चिन चेन हिचा पराभव करत आगेकूच केली, त्यावेळी तिची कामगिरी धडाकेबाज झाली. वास्तविक, ऑलिम्पिकपूर्वी बोर्गोहेनला चेनकडून 4 वेळा पराभूत व्हावे लागले होते. पण, येथे या सर्वोच्च व्यासपीठावर ती चेनविरुद्ध बाजी मारण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर उपांत्य फेरीत बोर्गोहेनला अपयश आले व उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली असल्याने ती कांस्य पदकाची मानकरी ठरली.

सुवर्ण विभागून घेणाऱया त्या जिगरी मित्रांचा खास उल्लेख!

बोर्गोहेनने वृत्तसंस्थेशी संवाद साधताना इटलीचा जियानमार्को व कतारचा बार्शिम या खास मित्रांनी सुवर्ण विभागून घेतल्याच्या आठवणीला देखील येथे उजाळा दिला. पुरुष गटातील उंच उडीत या उभयतांनीही 2.37 मीटर्सची उडी घेतली. दोघांचेही समान गुण असल्याने आणखी एक जम्प ऑफ घेण्याची अधिकाऱयांची ऑफर होती. मात्र, उंच उडीत दोन्ही ऍथलिट्स राजी असतील तर सुवर्णपदक विभागून घेण्याची मुभा असते. या या नियमाचा लाभ घेत जियानमार्को व बार्शिम यांनी मैत्रीचे उत्तम उदाहरण अवघ्या क्रीडा विश्वासमोर ठेवले होते. खेळ प्रत्येकाला एकत्र आणतो, हे मी त्या घटनेतून अनुभवले, असे लोवलिना येथे म्हणाली.

Related Stories

ऑस्ट्रेलिया युवा संघाच्या कर्णधारपदी कोनोली

Patil_p

बाद देणाऱया पंचांशी शुभमन गिलची हुज्जत!

Patil_p

लंकेच्या क्रिकेटपटूवर आठ वर्षांची बंदी

Patil_p

युक्रेनच्या टेनिसपटूवर आजीवन बंदी

Patil_p

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित वेळी घेण्याचा निर्धार

Patil_p

अल्ट्रा रनिंग चॅम्पियनशिप लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!