तरुण भारत

रेल्वेच्या कोच अन् बुकिंग कोडमध्ये लवकरच फेरबदल

नव्या बदलामुळे आवडीची सीट मिळवणे होणार सोपे

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

भारतीय रेल्वेने अनेक मार्गावर व्हिस्टाडोम कोचच्या गाडय़ा सुरू केल्या आहेत. या नव्या कोचमुळे रेल्वेने तिकिट बुकिंगच्या पद्धतीतही काही बदल केले आहेत. बुकिंग कोड आणि कोच कोड या दोन्हीमध्ये बदल  केल्यामुळे, प्रवाशांना नवे कोड लक्षात ठेवावे लागणार आहेत. दरम्यान रेल्वेने आणलेल्या नव्या कोड पध्दतीमुळे आता प्रवास सुखकर होण्यासह हवे ते आसन मिळवणेही अधिक सोपे होणार आहे.

 रेल्वेने हे बदल प्रवाशांच्या सोयीसाठीच केल्याचे सांगितले जात आहे. व्हिस्टाडोममुळे प्रवास पूर्वीच्या तुलनेने अधिक आरामदायी होण्याबरोबरच कोड व आरक्षण पध्दतीतील बदलांमुळे तिकीट बुक करताना आवडीची सीटही आरामात आरक्षित करता येणार आहे. देशभरात कित्येक मार्गांवर व्हिस्टाडोम कोच असलेल्या गाडय़ा सुरू केल्याने कोड सिस्टिममध्ये हा बदल केल्याचे सांगण्यात येत आहे.

  व्हिस्टाडोम कोचसोबतच एसी-3 टायरच्या इकॉनॉमी क्लासचाही समावेश करण्यात आला आहे. या कोचमध्ये सुमारे 83 बर्थ उपलब्ध असतील. थर्ड एसीच्या इकॉनॉमी कोचसाठी बुकिंग कोड ‘थ्री ई’ आणि कोच कोड ‘एम’ असणार आहे. या बर्थसाठीचे तिकीट दर मात्र अद्याप ठरवण्यात आलेले नाहीत. लवकरच याबाबत माहिती जाहीर केली जाईल असेही रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

रेल्वे प्रवासात निसर्ग सौंदर्याचा अनोखा अनुभव

व्हिस्टाडोम कोचचे छत काचेचे असल्यामुळे यातून बाहेरचे दृश्य पाहता येणार आहे. त्यामुळे प्रवासात निसर्गाच्या मनमोहक सौंदर्याचा आस्वाद प्रवासी घेऊ शकणार आहेत. सध्या दादर-मडगाव मार्गावरील गाडीला हा व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे.

असे असतील नवे कोच आणि बुकिंग कोड्स

व्हिस्टाडोम एसी कोचसाठी ‘ईव्ही’ हा कोड तर बुकिंग कोड ‘व्हीएस’ असेल. स्लीपर कोचसाठी बुकिंग कोड ‘एसएल’ व कोच कोड ‘ए’ असेल. एसी चेअरकारसाठी बुकिंग कोड ‘सीसी’ आणि कोच कोड ‘सी’, थर्ड एसीचा बुकिंग कोड ‘थ्रीए’ तर कोच कोड ‘बी’ आणि सेकंड एसीचा बुकिंग कोड ‘टूए’ व कोच कोड ‘ए’ असा निश्चित करण्यात आला आहे.

गरीब रथमधील एसी थ्री टायरचा बुकिंग कोड ‘थ्री ए’ व कोच कोड ‘जी’, गरीब रथ चेअरकारचा बुकिंग कोड ‘सीसी’ आणि कोच कोड ‘जे’, फर्स्ट एसीचा बुकिंग कोड ‘वन ए’ आणि कोच कोड ‘एच’ तर एक्झिक्युटिव्ह क्लासचा बुकिंग कोड ‘ई सी’ व कोच कोड ‘ई’ असणार आहे. अनूभुती क्लासचा बुकिंग कोड ‘ई ए’ आणि कोच कोड ‘के’, फर्स्ट क्लास कोचचा बुकिंग कोड ‘एफ सी’ व कोच कोड ‘एफ’ असणार आहे. व्हिस्टाडोम एसी चा कोच कोड व बुकिंग कोड दोन्ही ‘ई व्ही’ असे असतील.

काही बाबींची स्पष्टता लवकरच

 हे कोड परिचयाचे होईपर्यंत प्रवाशांचा काहीसा गोंधळ उडू शकतो. मात्र याचीही लवकरच प्रवाशांना सवय होईल, अशी अपेक्षा आहे. लवकरच या व्यवस्थेची अंमलबजावणी सुरु होणार आहे. याबाबतचे काही तपशीलही अजून जाहीर झालेले नाहीत. सर्व बाबी स्पष्ट झाल्यानंतर याबाबत मत व्यक्त करू, असे काही प्रवासी व प्रवासी संघयनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Related Stories

बांदा येथे परप्रांतीय कामगाराचा गळ्यावर वार करून खून

Ganeshprasad Gogate

कराड नगरपालिकेतर्फे विविध स्पर्धा

Patil_p

सिंधुदुर्गात क्वॉरन्टाईन तरुणाचा उपचारांसाठी नेत असताना वाटेत मृत्यू

Rohan_P

विनायक राऊत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

NIKHIL_N

घोळ माशांना अडीच लाखाची बोली

NIKHIL_N

रत्नागिरी : दापोलीत चोरट्यांनी दुकान फोडले

triratna
error: Content is protected !!