तरुण भारत

पुराबाबात उपाययोजना करा अन्यथा म्हादई काठावरील कृषिक्षेत्र धोक्यात

कर्नाटकी कारवांयावर लक्ष ठेवा : श्रीधर काळे; मेणला डोंगर खचल्याने पुराची स्थिती-गणेश पर्येकर.

उदय सावंत /वाळपई

Advertisements

 गेल्या तीन वर्षापासून सत्तरी तालुक्यातील म्हादई नदीच्या काठावर पूरस्थिती निर्माण होत आहे. दरवर्षी एक मीटरने पाण्याची पातळीत वाढ होत आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात कृषी विभागाची हानी होत आहे. आगामी काळात सरकारने याबाबत उपाययोजना करण्यावर भर न दिल्यास म्हादईच्या  काठावरील कृषी संपदा पूर्णपणे नष्ट होणार आहे. यामुळे सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी  मागणी सत्तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे. वेळूस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार पाfरषदेत सत्तरी तालुक्यात येणारा पूर व त्यामागची अनेक कारणे यासंदर्भात ज्येष्ठ शेतकर्‍यांनी विविध अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या आठवडय़ांत सत्तरी तालुक्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली व सत्तरीला पुराचा विळखा पडला. यामुळे अनेकांची घरे कोसळली तर अनेकांच्या घरांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी घुसल्यामुळे घरातील सामानाची प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन  संसार उद्धवस्त झाले.

 या धक्यातून आजहि सत्तरी तालुका सावरलेला नाहि. कोटय़वधी रुपयांची नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली व यामुळे सत्तरी तालुक्यात पूर आला. याची शक्यता प्रथमदर्शी व्यक्त करण्यात येत आहे. सत्तरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी वाळपईत एका खास पत्रकार पाfरषदेत नुकसानी बाबत माहिती दिली.

कर्नाटक सरकारच्या कारवायांवर लक्ष ठेवा

सोनाळ येथील ज्येष्ठ शेतकरी श्रीधर काळे यांनी यावेळी बोलताना यावर्षी प्रचंड प्रमाणात पाणी वाढले. एवढ्या प्रमाणात वाढलेले पाणी आम्ही कधीच पाहिले नाहि. यामुळे पुराची पाfरस्थिती निर्माण झाली. पंधरा वर्षापूर्वी सरकारने नदीवर बंधारे बांधलेले आहेत. यामुळे बंधार्‍यांच्या जलाशयावर अवलंबून असलेली नदीकाठी असलेली शेती बागायती आता हळूहळू नष्ट होऊ लागलेली आहे. सध्या म्हादई नदी व इतर नद्या गाळाने भरलेले आहेत. यामुळे नदी साफ होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळेच सत्तरी तालुक्यात पूर आला, असे यावेळी श्रीधर काळे म्हणाले. काळे यांनी कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे सत्तरी तालुक्यात पूर आला, असा अंदाज वर्तविला आहे. दहा दिवसांपूर्वी पूर आला होता; मात्र नदीचे पाणी अजूनहि गढूळ का? असा सवाल त्यांनी व्यक्त केला. यामुळे सरकारने कर्नाटकाच्या कारवायांवर गांभीर्याने नजर ठेवावी, अशी मागणी केली व नदीचे पात्र शक्य तेवढ्या लवकर स्वच्छ करावे, अशी सूचना काळे यांनी केली.

बंधार्‍यांना अडकणारी झाडे कारणीभूत : शिवराम राणे

यंदाच्या पुरामुळे जमीन खरडून जाण्याचा प्रकार झालेला आहे. गेली दोन वषे सत्तरी तालुक्यात 5 ऑगस्ट रोजी पुराची पारस्थिती निर्माण झाली होती. यापूर्वी काहि प्रमाणात सत्तरी तालुक्यात पूर आला. मात्र यंदा प्रचंड प्रमाणात पाण्याची पातळी वाढली. बंधार्‍याला अडकलेली झाडे न हटविल्यामुळे हि पारस्थिती निर्माण झाली आहे. सत्तरी तालुक्यातील बंधारे येणार्‍या काळात सत्तरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात धोकादायक ठरण्याची शक्यता सोनाळ येथील शिवराम राणे यांनी व्यक्त केली. येणार्‍या काळात सरकारने बंधार्‍यांच्या खांबांना अडकणारी झाडे पावसाळय़ातच काढण्याची व्यवस्था करावी, अन्यथा काठावरील शेती-बागायती पूर्णपणे नष्ट होऊन येणार्‍या काळात शेतकरी बांधवांचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती व्यक्त केली.

बंधारे सर्वस्वी कारणीभूत : कृष्णा सावंत

 बंधार्‍यांमुळे सत्तरी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. यासंदर्भाची उपाययोजना करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी बांधव करीत आहेत. मात्र सर्वसामान्याच्या या वेदनेला सरकारची यंत्रणा दाद देत नाहि, हि खेदाची बाब असल्याचे मत सावर्डे येथील कृष्णा सावंत यांनी व्यक्त केली.

‘मेणला’ डोंगर कोसळल्याने पूरस्थिती : गणेश पर्येकर

म्हादई नदीचा मुखावर असलेल्या मेणला डोंगराची एक मोठी कडा कोसळलेली आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह खाली आला आहे. त्याचप्रमाणे चिखल मिश्रित पाणी नदीच्या पात्रात घुसल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून नदीचे पाणी पूर्णपणे गढूळ झाले आहे. आपल्या उभ्या आयुष्यात अशा प्रकारच्या पाण्याची पातळी वाढली नाहि. बंधारे बांधण्यापूर्वी पूरण शेती व्यवसाय आपण करीत होतो. आता पूरण शेती व्यवसाय पूर्णपणे बंद झालेला आहे. सरकारने बांधलेले बंधारे हे खरोखरच शेतकरी बांधवांच्या मुळावर येतात की काय, असा सवाल उपस्थित होत  आहे. असे सावर्डे तार येथील ज्येष्ठ शेतकरी गणेश पर्येकर यांनी व्यक्त केले.

वसंत बंधारे सत्तरी तालुक्यासाठी शापच : रणजीत राणे

गेल्या सलग तीन वर्षाbपासून सत्तरी तालुक्यातील विविध भागात पूरस्थिती निर्माण होत आहे. यामुळे येणार्‍या काळात सत्तरी तालुक्याचे अस्तित्व खरोखरच शिल्लक राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या म्हादई नदीच्या पाण्यावर आज मोठ्या प्रमाणात कृषी संस्कृती जिवंत राहिली आहे व यामुळे हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाह होत आहेत. त्याच म्हादई नदीने अशाप्रकारे उग्ररूप धारण का करावे अशा प्रश्न आहे. सत्तरी तालुक्यात आलेला पूर हा मानवनिर्मित आहे. यामुळे सरकारने येणार्‍या काळात यासंदर्भाच्या उपाययोजना न केल्यास सातत्याने सत्तरी तालुक्याला पुराचा विळखा पडण्याची शक्यता आहे, असे मत कृषी उत्पादक रणजीत राणे यांनी व्यक्त केली. गेल्या तीन वर्षापासून आपल्याला दरवर्षी सुमारे पंधरा लाख रुपयांची हानी होत आहे. वसंत बंधारे सत्तरी तालुक्यासाठी वरदान नसून शापच आहे, असे ते यावेळी म्हणाले. नदीच्या पात्रात व्यवसायिक दृष्ट्या वाळू मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे नदीच्या पात्रातील गाळ वाहून जातो व पावसाळी मोसमात प्रचंड प्रमाणात लाटा निर्माण होतात. यामुळे अशी पारस्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या पुरामुळे सत्तरी तालुक्याचा कृषिविकास पvनास वर्षांनी मागे गेलेला आहे, अशी व्यथा रणजीत राणे यांनी मांडली.

Related Stories

फोंडा नगराध्यक्षाविरुद्ध अविश्वास नोटीस

Amit Kulkarni

कालेतील ट्रकांना तळे खाणीवर माल भरण्यास मज्जाव

Amit Kulkarni

अभिनय ही क्रिया नव्हे, प्रतिक्रिया

Amit Kulkarni

नवे बाधित 2030, बळी 52

Amit Kulkarni

म्हादईप्रश्नी ‘एनएचआय’ पथक गोव्यात

Amit Kulkarni

मंत्री मिलिंद नाईक यांच्यावरील खनीज चोरीचे आरोप खोटे

Patil_p
error: Content is protected !!