तरुण भारत

सोलापूर : लॉकडाऊनविरोधात आजपासून व्यापारी रस्त्यावर

प्रतिनिधी / पंढरपूर

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पंढरपूरात नुकताच 13 ऑगस्टपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यानंतर पंढरपूरातील व्यापारी महासंघाच्या वतीने लॉकडाउनला विरोध दर्शवण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मंगळवारपासून सलग तीन दिवस जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलनासाठी व्यापारी रस्त्यावर उतरणार आहेत.

Advertisements

रविवारी रात्री उशीराने पंढरपूरसह, माळशिरस, सांगोला, करमाळा, माळशिरस आणि माढा तालुक्यामध्ये लॉकडाउनचे आदेश पारित करण्यात आले. यानंतर सोमवारी सकाळपासून व्यापाऱ्यांमधून लॉकडाउनचा विरोध दिसून आला. यामध्येच सोमवारी सकाळी तात्काळ व्यापारी महासंघाची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान अवताडे यांच्यासह व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर उपस्थित होते.

या बैठकीप्रसंगी 13 ऑगस्टपासून सुरू होणा-या लॉकडाउनला विरोध करण्यात आला, तर मंगळवारी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये घंटानाद आंदोलन करण्यात येईल. बुधवारी अर्धनग्न आंदोलन तर गुरूवारी 12 ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले. या आंदोलनानंतरही जिलहा पन्रशासनाकडून लॉकडाउन मागे घेतला नाही. 13 ऑगस्टपासून नियम मोडून दुकाने सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. पंढरपूर शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या अत्यल्प आहे. तुलनात्मकदृष्टया ग्रामीण भागात रूग्णसंख्या अधिक आहे. अशा स्थितीत ग्रामीण परिसरामध्ये लॉकडाउनचे नियम अधिक वाढवावेत तर शहरामध्ये निर्बध्दात शिथिलता आणावी, अशी मागणी व्यापा-यांकडून होत आहे. यासाठी आ. प्रशांत परिचारक आणि आ. समाधान अवताडे यांचाही पाठींबा व्यपारी महासंघास मिळाला आहे.

पुन्हा लॉकडाउनचे नियम लादणे हे चुकेचे

पंढरपूरात पुन्हा लॉकडाउनचे नियम लादणे हे चुकेचे आहे. याबबात व्यापारी महासंघाच्या बैठकीमध्ये मंगळवारपासून तीन दिवस आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले. याबाबत मंगळवारी पुन्हा बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

सत्यविजय मोहोळकर, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

Related Stories

सोलापूर : तुळजाभवानी मातेची ऐतिहासिक भवानी तलवार अलंकार महापूजा

Abhijeet Shinde

पीककर्जापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – सहा. निबंधक अभय कटके

Abhijeet Shinde

जळगाव : डंपर-क्रूझरच्या भीषण अपघातात 10 ठार, 7 जखमी

prashant_c

सोलापूरमध्ये ‘चेस दि व्हायरस’ प्रभावीपणे राबवा : मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्या 503 कोरोनाबाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

सोलापूर : उजनीचे पाणी लातूरकरांसाठी मृगजळच!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!