तरुण भारत

राज्यातले एक मंत्री तुरुंगात जाऊन आले तर देशमुख जाण्याच्या तयारीत ; अतुल भातखळकरांची टीका


मुंबई \ ऑनलाईन टीम

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरु आहे. अनिल देशमुख आणि मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स बजावले आहेत. अनिल देशमुख यांनी प्रकृतीचे कारण देत चौकशीस हजर राहणार नसल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारचे मंत्री तुरुंगात जाऊन आले तर माजी मंत्री जाण्याच्या तयारीत आहेत. अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळतायत. दूध का दूध, पानी का पानी… ची गर्जना करणारे गेले काही दिवस गायब आहेत. बहुधा त्यांचं दूध नासलंय. राज्यतले एक मंत्री तुरुंगात जाऊन आले आहेत, देशमुख जाण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे मंत्रिमंडळात ‘खो खो’ चा खेळ सुरू आहे.


ईडीने दिलेल्या माहितीनुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही. ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही. त्यांच नेमकं ठिकाण माहीत नाही. अशी प्रतिक्रिया ईडीने दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावले आहेत. मात्र अनिल देशमुख यांनी प्रकृतीचे कारण देत चौकशीस प्रत्यक्ष हजर राहता येणार नाही असे सांगितले आहे. तर व्हिसीद्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

Advertisements

Related Stories

बारामुल्लामध्ये सर्च ऑपरेशन

datta jadhav

पश्चिम बंगालला ‘यास’ चक्रीवादळाचा तडाखा; ममता बॅनर्जी म्हणाल्या…

Rohan_P

मृत झालेल्या कोरोना रूग्णावर अंत्यसंस्कारासाठी गट निहाय स्मशानभूमीची व्यवस्था करा

triratna

कोरोना हरतोय…3124 जणांना डिस्चार्ज

Patil_p

नोएडाचे भाजपाचे आमदार पंकज सिंह कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई रुग्णालयात दाखल

Rohan_P
error: Content is protected !!