तरुण भारत

फलटण तालुक्यातील 29 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन

बिबी / वार्ताहर :  

फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, फलटणचे प्रांताधिकारी तथा इन्सिडेंट ऑफिसर शिवाजीराव जगताप यांनी फलटण तालुक्यातील 29 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित केला आहे.    

Advertisements

कोळकी गावातील वनदेव शेरी, सावतामाळी नगर, चिंतामणी पार्क, त्रिमूर्ती अपार्टमेंट, व्यंकटेश अपार्टमेंट, चैतन्य अपार्टमेंट, शारदानगर हा भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. दुधेबावी गावातील काळे मळा चौंडी ते गावठाण दुधेबावी रोड या भागात कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.  तर तरडगाव, कुरवली बुद्रुक, निंबळक, बरड, गिरवी, पाडेगाव, शिंदे माळ, जाधववाडी, हिंगणगाव, साखरवाडी, राजुरी, पिंपरद, कांबळेश्वर, दुधेबावी, राजाळे, सुरवडी, वडले, मुंजवडी, आदर्की बुद्रुक, वाखरी, सस्तेवाडी, चौधरवाडी, सरडे, खामगाव, फडतरवाडी, मठाचीवाडी, खडकी या गावात संपूर्ण गावांमध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.

Related Stories

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर वाई पोलिसांची कारवाई

triratna

कराडात 186 रिक्षाचालक निगेटिव्ह

Patil_p

साताऱयात भाजी विक्रेत्यांना पोलिसांची मारहाण

Amit Kulkarni

जिह्यात आज सिमोल्लंघन

Patil_p

पोलिसाला धमकी प्रकरणी आरोपीला 1 वर्ष कारावास

Patil_p

सातारा : गोळेश्वर कराडला आयपीएल सट्टयावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

triratna
error: Content is protected !!