तरुण भारत

श्रावण मेळाच्या माध्यमातून लोककला पुनर्जीवित करण्याचे काम

कुडाळ / वार्ताहर-

कोकण ही लोककलावंताची जननी आहे. पूर्वी अतिशय कठीण परिस्थितीतून या कलावंतांनी या लोककला जोपासल्या.परंतु सध्याच्या डिजिटल युगात नवीन पिढी या कलेपासून दूर जात आहे .श्रावण मेळाच्या माध्यमातून या कला पुनर्जीवित करण्याचे स्तुत्य काम कुडाळ प. स.ने केले आहे, असे गौरवदगार जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांनी सोमवारी सायंकाळी येथे केले. येथील कलाकारांना पाच हजार रुपये मानधन मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करेन ,अशी ग्वाही त्यांनी देत जि प. माध्यमातून गणेश चतुर्थी नंतर लोककलाकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करणार असल्याचेही जाहीर केले.

Advertisements

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोककलांचा प्रचार – प्रसार करून साकृतिक कला शेत्रात भरीव योगदान दिलेल्या कुडाळ तालुक्यातील कलाकारांचा सन्मान करण्यासाठी कुडाळ पंचायत समितीच्यावतीने येथील सिद्धिविनायक सभागृहात जिल्ह्यात प्रथमच आयोजित केलेला श्रावण मेळा कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमाचा समारोप जि.प.अध्यक्षा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ,तर आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

व्यासपीठावर जि. प.मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, जि.प.गटनेते नागेंद्र परब,कुडाळ सभापती नूतन आईर ,उपसभापती जयभारत पालव, प. स. सदस्या सुप्रिया वालावलकर ,सदस्य मिलिंद नाईक, बाळकृष्ण मडव व गोपाळ हरमलकर , पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गणपत मसगे ,गटविकास अधिकारी विजय चव्हाण,सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, डॉ.रामचंद्र भरतू ,वृध्द कलाकार मानधन समिती अध्यक्ष राजा सामंत , सविता आश्रमचे संदीप परब व अन्य मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील १७४ कलाकाराचा सन्मान करण्यात आला.यात दहा कलाकारांना मानपत्र, तर उर्वरीताना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच जीवनावश्यक वस्तूही देण्यात आल्या. आठ प्रभाग संघाना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

वैभव नाईक म्हणाले, दळण वळणाची कुठलीही साधने नसताना त्या काळी या कलाकारांनी कला जीवंत ठेवल्या. या कलाकारांनी मानधन किंवा पुरस्काराची अपेक्षा ठेवली नाही. दरवर्षी २०० कलाकारांच्या प्रस्ताव मंजूर व्हावे,अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे सांगितले. नायर, जाधव , परब यांनी मनोगत व्यक्त केले. प. स. च्या कार्यक्रमाचे मान्यवर व उपस्थित कलाकारांनी कौतुक केले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी चव्हाण यांनी , निवेदन राजा सामंत यांनी,तर आभार सभापती आईर यांनी मानले.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाचा विळखा

triratna

भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न हवे!

NIKHIL_N

कळणेवासीय स्वातंत्र्य दिनाच्या उपोषणावर ठाम

Ganeshprasad Gogate

बांदा मासळी मार्केट परिसरातील नाल्याच्या स्वच्छतेची मागणी

Rohan_P

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

NIKHIL_N

आरोग्य केंद्रासह अकरा नवीन उपकेंद्रे

NIKHIL_N
error: Content is protected !!