तरुण भारत

बांधकाम खात्याच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा बळी

वाठार स्टेशन / प्रतिनिधी : 

वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्रुक येथे वाकड्या पुलावर संरक्षण कठाडे नसल्याने एक युवक दुचाकीसह पुलावरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Advertisements

लखन राजगे (वय 27, रा. क्षेत्रमाहुली, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास लखन राजगे हा वाठार स्टेशनवरून पिंपोडे बुद्रुकच्या दिशेने चालला होता. या रस्त्यावरील वाकड्या पुलावर आला असता त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो थेट पुलाला संरक्षण कठाडा नसल्याने  पुलावरून खाली कोसळला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच वाठार पोलीस ठाण्याचे स.पो.नि स्वप्नील घोंगडे, पोलीस कर्मचारी तुषार आडके, अतुल कुंभार, धुमाळ, चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्यावर संताप व्यक्त केला. वेळोवेळी मागणी करूनही पुलाला संरक्षक कठडे करण्यात आले नाहीत. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.

Related Stories

जगतापवाडीत पिण्याच्या पाण्यात आळ्या

Patil_p

कृषी विभागातर्फे 1 लाख 17 हजार 730 मेट्रिक टन खत साठा मंजूर

Patil_p

बारामतीत बनावट ‘रेमडेसिवीर’चे रॅकेट उघडकीस

datta jadhav

कोव्हॅक्सिन च्या दुसऱया डोससाठी नागरिकांची गर्दी

Patil_p

मनाविरुध्द बदली झाल्याने पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Patil_p

गड्या आपली झेडपीचीच शाळा बरी

triratna
error: Content is protected !!