तरुण भारत

पंकजा मुंडेंच्या हस्ते मंत्री भागवत कराड यांचा सत्कार

मुंबई/प्रतिनिधी

अलीकडेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून डॉ. भागवत कराड यांना मंत्री म्हणून साधी देण्यात आली. खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होत्या पण त्यांनी मेळवा घेऊन आपण नाराज नसल्याचे सांगितले होते. पण माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर नवे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार केला. पंकजा मुंडे यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी भागवत कराड यांचा सत्कार केल्याचा फोटो समोर आला आहे.

प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद मिळाल्यानं पंकजा समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांच्या वरळी इथल्या निवासस्थानी धाव घेत योग्य निर्णय घेण्यासाठी दबाव आणला होता. पण मुंबईत मुंडे समर्थकांचा छोटेखानी मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

पंकजा यांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची भेट वारंवार टाळल्याची चर्चा होती. मात्र कालच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंच्या हस्तेच भागवत कराड यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisements

Related Stories

महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर

triratna

23 लाखांच्या बनावट नोटांप्रकरणी एकाला अटक

Patil_p

सांगलीत ‘ऑनलाईन टिचींग’ चा फंडा

triratna

सीबीएसईच्या दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करा : मनीष सिसोदिया

Rohan_P

बँड-बेंजो व तमाशातील कलावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न करू – मंत्री आमित देशमुख

triratna

बॅंड-बेन्झो कलाकारांचे प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीने सोडविणार

Patil_p
error: Content is protected !!