तरुण भारत

सांगली : दुधोंडी तिहेरी खून प्रकरणात आणखी एकास अटक

जखमींना रुग्णालयातून घरी सोडले


पलुस / प्रतिनिधी

Advertisements

संपूर्ण जिल्हा हादरून सोडणाऱ्या पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे घडलेल्या तिहेरी खून प्रकरणातील पूर्वीच्या आठ आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून प्रकरणातील आणखी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान जखमींची प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दुधोंडी येथे झालेल्या तिहेरी खून प्रकरणाच्या तपासाला योग्य दिशा मिळाली असून या प्रकरणतील हिम्मत मोहिते या आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दि.१ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशी दोन गटात धुमसचक्री झाली होती. या दरम्यान आरोपींनी वापरलेली चाकू सूरा, गुप्ती पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

रविवार दि. १ ऑगस्ट रोजी दुधोंडी येथे दोन गटात मोठ्या प्रमाणात धुमचक्री झाली. यामध्ये तिघांचा खून झाला. या घटनेने जिल्हयात खळबळ उडाली होती पोलिसांनी तात्काळ संशशियत आठ आरोपींना ताब्यात घेवून त्यांना अटक केली. तिठेरी खून प्रकरण घडण्यामागे जयंती साजरी करणे ऐवढचे कारण नसून त्यास पूर्वर्वमन्साचे कारण पुढे आले आहे. तिहेरी खून प्रकरणात जखमी झालेल्या तिघांची प्रकृतीत सुधारणा झाल्याने या तिघांनाठी रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. अधिक तपास तासगाव पोलीस ठाण्याच्या डिवाय एस.पी. अश्विनी शेंडगे करीत आहेत.

Related Stories

सांगली : खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही – अनिल पाटील

triratna

कडेगाव तलावात सध्या केवळ ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक

triratna

मातंग समाजातर्फे डॉ. विश्वजीत कदम यांचा सत्कार

triratna

सांगली : हरिपूर ग्रामपंचायत सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित

triratna

सांगली : कुपवाड घरफोडी प्रकरणी चोरट्यास अटक, ७६ हजाराचे दागिने हस्तगत

triratna

कवींनी शाहूंचे जीवन समाजासमोर आणावे : पाटील

triratna
error: Content is protected !!