तरुण भारत

इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये 22 हजार कोटींची भर

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकीसाठी अनेकांची सध्या चढाओढ दिसते आहे. कारण जुलैमध्ये गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद नोंदवला असल्याचे दिसून आले आहे. जुलै महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये 22 हजार 583 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सलगच्या पाचव्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक सकारात्मक राहिली आहे. अनेकांनी फ्लेक्सी कॅप श्रेणीतील गुंतवणूकीला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याचे समोर आले आहे.

Advertisements

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस् इन इंडिया यांनी वरील आकडेवारी नुकतीच सादर केली आहे. जूनमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात 5 हजार 988 कोटी रुपयांची निव्वळ स्वरुपाची गुंतवणूक पाहायला मिळाली होती. यापूर्वी ‘मे’त 10 हजार 83 कोटी रुपयांची तर एप्रिलमध्ये 3 हजार 437 कोटी, मार्चमध्ये 9 हजार 115 कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडांमध्ये झाली.

Related Stories

जानेवारी-जूनमध्ये जीवन विमा कंपन्याचा प्रिमियम घटला

Omkar B

आशिया विकास बँक जलवायू प्रकल्पांसाठी 66 कोटी उभारणार

Patil_p

आयुष्याच्या तीन टप्प्यांवर करावयाची गुंतवणूक

Patil_p

रुपे कार्डावरून करा ऑफलाइन व्यवहार

Patil_p

एसीसीच्या निव्वळ नफ्यात 74 टक्के वाढ

Patil_p

देशामध्ये 46 अन्न प्रक्रिया प्रकल्पांचा प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!