तरुण भारत

वाहन विक्री वाढीने उत्साहाचे वातावरण

विक्रीत दुचाकीची आघाडी, जुलैमध्ये इतर सर्व प्रकारच्या वाहन विक्रीत वाढ

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

संपूर्ण देशातील राज्यांमध्ये व्यावसायिक हालचाली गतीमान होत असून ऑटोमोबाइल क्षेत्रात वाहन विक्रीतही वाढ दिसत असून उत्साहाचे वातावरण पसरले आहे. वाहन मागणीत येणाऱया काळात वाढीचे संकेत असून सध्याची विक्री ही कोरोनापूर्व पातळीवर पोहचली आहे.

जुलैमधील वाहन विक्रीच्या आकडेवारीवरून सध्या तरी वाहन विक्रीला पोषक वातावरण असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. जुलैमध्ये सर्व प्रकारातील वाहन विक्रीत जवळपास 28 टक्के वाढ झाली आहे. जुलैमध्ये एकूण 15 लाख 56 हजार 777 वाहनांची विक्री झाली आहे. जूनमध्ये मात्र 12 लाख 17 हजार 151 वाहनांची विक्री झाली होती. ऑटोमोबाइल क्षेत्राची वाटचाल आशादायी दिसते आहे. यात ट्रक्टर विक्रीने तर मागच्या महिन्यातच कोरोनापूर्व परिस्थितीतील विक्रीची नोंद केली आहे. जुलैमध्ये 2 लाख 61 हजार 744 पॅसेंजर वाहनांची विक्री झाली असून महिन्याच्या आधारावर पाहता ती 41 टक्के अधिक आहे.

11 लाख दुचाकींची जुलैमध्ये मागणी

दुसरीकडे दुचाकी विक्रीचा विचार करता जुलैमध्ये रजिस्ट्रेशनचे (नोंदणी) प्रमाण उत्साहवर्धक राहिले असून या जोरावरच ऑटोमोबाइल क्षेत्राच्या पुढच्या वाटचालीची दिशा चांगली राहणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. जुलैमध्ये 11 लाख 32 हजार 611 नव्या वाहनांची नोंदणी झाली असून मागच्या महिन्याच्या तुलनेत (9 लाख 30 हजार 324) 22 टक्के अधिक आहे. तर तिचाकी विक्री 89 टक्के वाढून 27 हजार 904 वर पोहचली आहे, जी जूनमध्ये 14 हजार 732 इतकी होती.

टॅक्टर विक्रीत 58 टक्के वाढ

ट्रक्टर विक्रीनेही दमदार कामगिरी केली आहे. जुलैमध्ये 58 टक्के वाढीसह 82 हजार 388 ट्रक्टर्सची विक्री झाली आहे. मागच्या जूनमध्ये 52 हजार 261 ट्रक्टर्सची विक्री झाली आहे.

जुलैमधील विविध गटातील वाहन विक्रीची आकडेवारी

  • दुचाकी…….. 11 लाख 32 हजार 611
  • तिचाकी……. 27 हजार 904
  • पॅसेंजर वाहने. 2 लाख 61 हजार 744
  • व्यावसायिक वाहन            52 हजार 130
  • ट्रक्टर्स     82 हजार 388

Related Stories

फॉक्सकॉनचा कारखाना पुन्हा सुरू होणार

Amit Kulkarni

ऑडी क्यू 7 साठी बुकिंग सुरू

Patil_p

BMW ची ‘ग्रॅन कुपे’, ‘एम 8 कुपे’ भारतात लॉन्च

datta jadhav

हिरो इलेक्ट्रीकची नवी गाडी बाजारात

Patil_p

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘Hero Motocorp’ ची मोबाईल ॲम्बुलन्स

prashant_c

टेस्लासमोर कार सादर करण्याच्या अडचणी

Patil_p
error: Content is protected !!