तरुण भारत

अफगाणिस्तानातून त्वरित बाहेर पडावे

भारतीय नागरिकांना सूचना : तालिबानचे हल्ले

वृत्तसंस्था /मजार-ए-शरीफ

Advertisements

अफगाणिस्तानच्या 6 प्रांतांवर कब्जा केलेले तालिबानी दहशतवादी आता मजार-ए-शरीफ शहरापर्यंत पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना त्वरित अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची सूचना काबूलमधील दूतावासाने केली आहे. भारतीय कंपन्यांनाही त्यांच्या कर्मचाऱयांना त्वरित मायदेशी पाठविण्यास सांगण्यात आले आहे.

अफगाणिस्तान सैन्य आणि तालिबान यांच्यात शहराच्या बाहेरील भागात भीषण युद्ध सुरू आहे. हे महासंकट पाहता भारताने मजार-ए-शरीफमध्ये सक्रीय स्वतःच्या एकमात्र महावाणिज्य दूतावासामधून कर्मचारी आणि काही भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी भारताच्या वायुदलाचे विशेष विमान मजार-ए-शरीफमध्ये पोहोचणार आहे. या विशेष विमानातून मायदेशी परतावे असे आवाहन भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना केले आहे.

काबूलमधील दूतावास सुरूच

काबूलमधील भारतीय दूतावासात नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी तेथेच राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य परतल्यावर तालिबानने भीषण हल्ले सुरू केले असून देशाच्या बहुतांश हिस्स्यांवर त्याचा कब्जा झाला आहे. तालिबानने देशाच्या 6 प्रांतांच्या राजधान्यांवर नियंत्रण मिळविले आहे.

Related Stories

मेक्सिकोमध्ये 13 हजारपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण ; 1,165 जणांचा मृत्यू

Rohan_P

स्पेनचे पर्यटन संकटात

Patil_p

अफगाणिस्तानातील सैन्य माघारीची प्रक्रिया लांबणार

Patil_p

इथियोपियात संघर्षात 200 हून अधिक जणांचा मृत्यु

Patil_p

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान

datta jadhav

पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईकची मालिका

Patil_p
error: Content is protected !!