तरुण भारत

लैंगिक शोषणाप्रकरणी न्यूयॉर्कच्या गव्हर्नराचा राजीनामा

तपासात 11 महिलांच्या तक्रारीत आढळले तथ्य

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

Advertisements

11 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्यावरही न्यूयॉर्कच्या गव्हर्नरपदावर कायम राहण्याचा हट्ट एंड्रय़ू कुओमो यांनी अखेर सोडला आहे. कुओमो यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या स्थानी आता लेफ्टनंट गव्हर्नर कॅथी होचुल यांना न्यूयॉर्कचे गव्हर्नरपद मिळणार आहे. होचुल या न्यूयॉर्कचे सर्वोच्च पद भूषविणाऱया पहिल्या महिला ठरतील.

स्थिती पाहता माझ्या प्रशासनासाठी मी राजीनामा देणे हीच सर्वात मोठी मदत ठरणार असल्याची टिप्पणी करत कुओमो यांनी पद सोडले आहे. तत्पूर्वी कुओमो यांनी स्वतःच्या कार्यालयातील सहकाऱयांना संबोधित करत आपण कधीच कुठल्याही महिलेचा अनादर केलेला नाही तसेच करणार नसल्याचे म्हटले आहे.

कुओमो यांच्याविरोधात वातावरण तयार करण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका आहे. आरोपांचे समर्थन न करणाऱया लोकांना तपासात सामील करण्यात आले नसल्याचा दावा कुओमो यांच्या वकील रीटा ग्लॅविन यांनी केला आहे.

कुओमो यांच्याविरोधात प्रांताच्या ऍटर्नी जनरल लेटीटिआ जेम्स यांच्याकडून महिलांचे लैंगिक शोषण करण्याच्या आरोपांचा तपास करत आहेत. तपासादरम्यान या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले आहे. मागील आठवडय़ात कुओमो यांनी हे आरोप नाकारत पदावर कायम राहण्याची भूमिका घेतली होती. कुओमो यांना राजीनामा देण्याची सूचना अध्यक्ष जो बायडेन यांनीही केली होती. कुओमो यांचा न्यूयॉर्क गव्हर्नर म्हणून हा तिसरा कार्यकाळ होता.

Related Stories

एकेकाळी मोलकरीण आता टीव्हीवर सूत्रसंचालिका

Patil_p

निर्बंध आणखी कठोर

Patil_p

बिहारच्या राजकारणात ‘लालू रिटर्न्स’

Patil_p

लसीकरणात भारत, अमेरिका, चीन आघाडीवर

Patil_p

ट्रम्प यांना ट्विटरचा दणका; अकाऊंट केले कायमस्वरूपी बंद

datta jadhav

नौदलाला मिळाले एमएच-60 आर हेलिकॉप्टर

Patil_p
error: Content is protected !!