तरुण भारत

बुर्ज खलिफावर उभं राहून शूट केली जाहिरात

व्हिडिओ पाहून अंगावर काटा येणार

संयुक्त अरब अमिरातमधील सर्वात मोठी विमानोड्डाण कंपीन इमिरेट्स सध्या चर्चेत आली आहे. इमिरेट्सने अलिकडेच एका जाहिरात प्रसिद्ध केली असून ती मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामागे कारण देखील तसंच आहे. या जाहिरातीमध्ये महिला दुबईतील सर्वात इंच इमारत बुर्ज खलिफावर उभी आहे. 30 सेकंदांची ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून अनेकांच्या अंगावर काटा आणणारी ही जाहिरात ठरली आहे.

Advertisements

या जाहिरातीमध्ये दिसणाऱया तरुणीचे नाव निकोल असून ती एक प्रोफेशनल स्कायडायव्हिंग इन्स्ट्रक्टर आहे. इमिरेट्सची केबिन क्रू सदस्य म्हणून तिला या जाहिरातीत दर्शविण्यात आले आहे. जाहिरातीत निकोल इमिरेट्सच्या गणवेशात दिसून येते. यावेळी तिच्या हातात मेसेज बोर्ड असून त्यात ती आम्ही जगाच्या शिखरावर असल्याचे सांगताना दिसून येते. पण त्यानंतर कॅमेरा पॅन होताच निकोल बुर्ज खलिफा इमारतीच्या टोकावर उभी असल्याचे स्पष्ट होते. अत्यंत जबरदस्त असे दृश्य दाखविणारा हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटते. जमिनीपासून 822 मीटर उंची असणारी ही इमारत जगातील सर्वाधिक उंच इमारत आहे.

निकोलनेही स्वतःच्या इन्स्टाग्रामवर जाहिरात शेअर केली असून आतापर्यंतचा हा सर्वात मजेशीर आणिर थरारक अनुभव होता असे म्हटले आहे. तसेच तिने कंपनीच्या कल्पनेचेही कौतुक केले आहे. दरम्यान हा व्हिडिओ पाहिल्यावर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत असून कौतुकाला उधाण आले आहे. कमेंटमध्ये तर अक्षरक्षः पाऊस पडला आहे. तर कंपनीने ही जाहिरात कशी चित्रित केली याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Related Stories

तुर्कस्तानशी ‘मैत्री’ पाकिस्तानला महागात

Patil_p

चीनमध्ये 3 वर्षापुढील मुलांचेही लसीकरण

datta jadhav

चीनचे लाजिरवाणे कृत्य, ऑस्ट्रेलिया संतप्त

Patil_p

लाख-कोटींमध्ये नव्हे, केवळ 86 रुपयांत घर

Patil_p

चीनमध्ये सातव्या जनगणनेचे काम सुरू

Patil_p

एकटाच पकडतो मगर

Patil_p
error: Content is protected !!