तरुण भारत

केरळात चिंतेचे वातावरण कायम

लस लाभार्थींनाही कोरोना संसर्ग- प्रतिकाराला दाद न देणाऱया विषाणूचा प्रसा

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

केरळात दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधक लस घेतलेले लाभार्थींही ‘पॉझिटिव्ह’ झाल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच एकदा कोरोनावर मात केलेले रुग्ण पुन्हा बाधित होत असल्याने प्रतिकाराला दाद न देणारा विषाणू तयार झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत केरळात 40 हजार तर देशभरात जवळपास 1 लाख प्रकरणे आढळल्याचा दावा केला जात आहे. एकंदर कोरोनाच्या या स्थितीने आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिल्याचे दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पुरविण्यात आलेल्या माहितीनुसार, केरळात आतापर्यंत 40 हजारहून अधिक रुग्ण कोरोनाच्या वेगवेगळय़ा लक्षणांनी प्रभावित असल्याचे दिसून येत आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाणही अधिक आहे. गेल्या काही दिवसात पहिला डोस  घेतलेल्या 14 हजार 974 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच 5 हजार 042 जणांना दुसरा डोस घेतल्यानंतरही कोरोनासंसर्ग झाला आहे.

केरळमध्ये मंगळवारी कोरोनाची लागण झालेल्या 21 हजार 119 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढून 35 लाख 86 हजार 693 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 18 हजार 004 वर पोहोचली आहे.

Related Stories

”…तर तालिबान्यांना सडेतोड उत्तर देऊ” – जो बायडेन

Abhijeet Shinde

पत्नी अन् 5 मुलांवर कुऱहाडीने वार, 4 ठार

Patil_p

मासे सांगणार नदी प्रदूषणाची पातळी

Patil_p

उत्तराखंडचे नेतृत्त्व आता तीरथसिंग रावत यांच्याकडे

Patil_p

सोलन जिल्ह्यात 5 नवे रुग्ण, हिमाचल प्रदेशमध्ये एकूण कोरोना रुग्ण संख्या 115 वर

Omkar B

ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश?

datta jadhav
error: Content is protected !!