तरुण भारत

पीएसजीला चॅम्पियन्स लीग मिळवून देणे मुख्य लक्ष्य

संघाशी करारबद्ध झाल्यानंतर लायोनेल मेस्सीचे प्रतिपादन

पॅरिस / वृत्तसंस्था

Advertisements

चॅम्पियन्स लीग स्पर्धा आणखी एकदा जिंकण्यासाठी मी ‘योग्य ठिकाणी’ आलो आहे. नेमारसमवेत एकत्रित खेळता यावे, यासाठी देखील हा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन लायोनेल मेस्सीने बुधवारी केले. पीएसजी संघात दाखल झाल्यानंतर तो माध्यमांना संबोधित करत होता.

34 वर्षीय मेस्सीने बार्सिलोना संघाला अलविदा केल्यानंतर आठवडाभराच्या आतच पीएसजी संघाशी 2 वर्षांचा नवा करार केला. कतारी गुंतवणूकदार लाभलेला पीएसजीचा संघ यापूर्वी 2020 मध्ये जेतेपदाच्या उंबरठय़ावर आला होता. मात्र, अंतिम लढतीत त्यांना बायर्न म्युनिचविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

दुसरीकडे, मेस्सीने बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीग जिंकून देण्यात 4 वेळा यश संपादन केले. मेस्सीने बार्सिलोनाकरिता आपले मानधन निम्म्यावर आणण्याची तयारी दर्शवली. पण, समोर कर्जाचा डोंगर असल्याने ते मानधनही बार्सिलोनाला सोसणे शक्य नव्हते आणि त्यांनी हा करार होऊ शकणार नसल्याचे जाहीर केले. बार्सिलोना संघावर 9 हजार कोटींचे कर्ज असल्याचे वृत्त आहे.

मेस्सी बार्सिलोना संघातून का बाहेर पडला?

लायोनेल मेस्सी मागील दोन दशकभरापासून बार्सिलोना संघाचा अविभाज्य घटक राहिला आहे. 2003 पासून त्याने या क्लब संघातर्फे 778 सामने खेळले असून त्यात 672 गोल केले. यंदा बार्सिलोना संघातून बाहेर पडण्याची त्याची इच्छा नव्हती. मात्र, बार्सिलोना संघ आर्थिक अरिष्टात असल्याने व ला लिगाच्या प्रतिकूल फायनान्सियल फेयर प्ले (एफएफपी) नियमामुळे त्यांचा करार होऊ शकला नाही, असे वृत्त आहे.

Related Stories

अमेरिकेची जेनीफर ब्रॅडी अजिंक्य

Patil_p

लक्ष्य सेन पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

सिनेर, कारात्सेव्ह दुसऱया फेरीत, डिमिट्रोव्ह पराभूत

Patil_p

हैदराबाद-दिल्ली कॅपिटल्स संघात आज लढत

Patil_p

लक्ष्य सेन, श्रीकांत यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त

Patil_p

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा

Patil_p
error: Content is protected !!