तरुण भारत

पूरग्रस्तांना आज पणजीत मदतनिधीचे वितरण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थेट खात्यात जमा होणार निधी

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गत महिन्यात 23 रोजी राज्यात आलेल्या महापूरात घरे कोसळून सर्वस्व गमावलेल्या पूरग्रस्तांना आज दि. 12 रोजी मदतीचे वितरण करण्यात येणार आहे.

सायंकाळी 4 वाजता पणजीतील इन्स्टिटय़ूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात हा  कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार असून त्यांच्याच हस्ते पूरग्रस्तांना मदत वितरित करण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स पद्धतीने हा मदतनिधी त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

या महापूरामुळे सांखळी, वाळपई, फोंडा या मतदारसंघातील अनेकांचे संसार अक्षरशः उध्वस्थ झाले. वर्षावर्षांच्या कष्टातून उभारलेला संसार क्षणार्धात घरासकट पाण्यात कोसळून होत्याचे नव्हते होताना पाहण्याचे दुर्भाग्य अनेकांच्या नशिबी आले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, मामलेदार, तलाठी, तसेच अग्नीशामक दल, वीज खाते, पोलीस यासारख्या खात्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी सर्व पूरग्रस्त भागांची पाहणी करून शक्य तेवढी मदत करतानाच पुढेही सर्व मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा अधिवेशनातही सदर विषय चर्चेस आला असता मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येकाला शक्य तेवढी जास्त मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच अर्थ खात्याने या आर्थिक मदतनिधीस मान्यता दिली होती. त्याद्वारे पूर्ण कोसळलेल्या पक्क्या घरासाठी दोन लाख, कच्च्या घरासाठी एक लाख तर अंशतः कोसळलेल्या पक्क्या घरासाठी 50 हजार आणि कच्च्या घरासाठी 20 हजार अशी मदत देण्यात येईल अधिसूचना जारी केली होती.

Related Stories

सांखळी नगराध्यक्षपदी यशवंत माडकर

Omkar B

मास्क न लावणाऱयांना आता शंभर रुपये दंड

Omkar B

खैर झाडांची बेकायदेशीर कत्तलप्रकरणी पाचजणांना अटक

Amit Kulkarni

फातोर्डा व मडगाव भाजपतर्फे निषेध

Patil_p

ऑनलाईन धोरणामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा – आमदार सुदिन ढवळीकर

Omkar B

काणकोणातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करा

Omkar B
error: Content is protected !!