तरुण भारत

पट्टणकुडी येथे डॉक्टरांचा सन्मान

वार्ताहर /पट्टणकुडी

कोरोना काळात प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा केलेल्या येथील डॉक्टरांचा महालक्ष्मी मेडिकल पदाधिकाऱयांच्यावतीने सत्कार करण्यात आला. मेडिकलचे सचिन चिलाई अनेक सामाजिक कार्ये होती घेतले असून यापूर्वीही त्यांनी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर असे उपक्रम राबविले आहेत. आता पट्टणकुडीत गत दोन वर्षाच्या काळात कोरोनायोद्धे म्हणून प्रामाणिकपणे काम केलेल्या येथील डॉक्टरांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. डॉ. के. आर. गुरव, दिलीप दिवटे, सतीश गुरव, प्रकाश इंगळे, नागराज होनमणी, उमर तहसीलदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन चिलाई, बाहुबली पाटील, योगेश वाघे, सूदर्शन कागे, विकास कागे, सचिन पाटील, अक्षय कागे, सम्मेद पाटील, अभिषेक चिलाई आदी  उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

मराठा मंडळ दंत वैद्यकीय महाविद्यालयात कोविड तपासणी केंद्र सुरू

Amit Kulkarni

आविष्कार-आयएमईआरमध्ये समन्वय करार

Omkar B

वार्तांकन स्पर्धेचे बक्षीस वितरण

Amit Kulkarni

रविवारीही रुग्णसंख्या एक हजार पार

Amit Kulkarni

अतिवाड येथील त्या प्रकरणाची सखोल चौकशी

Patil_p

निवृत्त कर्मचाऱयांची पेन्शनसाठी जोरदार निदर्शने

Amit Kulkarni
error: Content is protected !!