तरुण भारत

सिद्धार्थ पिठानीला दिलासा नाहीच, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

ऑनलाईन टीम / मुंबई : 


बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मुत्यूशी संबंधित अमली पदार्थांच्या प्रकरणात पोलिसांनी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला अटक केली होती. आता सिद्धार्थचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाला सिद्धार्थचा जामीन अर्ज मान्य करण्याचे कोणतेही योग्य कारण न मिळाल्याने हा अर्ज फेटाळण्यात आला. सिद्धार्थचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळण्याची ही दुसरी वेळ आहे. 

Advertisements


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामीन अर्जात न्यायालयाला सिद्धार्थला जामीन देण्याचे कोणतेही ठोस कारण मिळाले नसल्याने न्यायालयाने हा अर्ज नामंजूर केला आहे. यापूर्वीही सिद्धार्थची याचिका फेटाळण्यात आली होती. 


दरम्यान, एनसीबीने सिद्धार्थला 28 मे रोजी अटक केली होती. सिद्धार्थच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोलिसांना त्याच्या ठिकाणाबद्दल माहिती मिळाली होती. 25 जून रोजी लग्नासाठी न्यायालयाने सिद्धार्थला तुरुंगातून बाहेर जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर 2 जुलै रोजी सिद्धार्थने पुन्हा स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले होते.


दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत सोबत इतर काही जणांना देखील अटक केली होती. 

Related Stories

‘येरे येरे पावसा’ चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव

datta jadhav

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Rohan_P

सांग तू आहेस काद्वारे सानिया चौधरीचं मालिका विश्वात पदार्पण

Patil_p

एक वर्षापर्यंत ‘कार’मध्येच राहिली डॉक्टर

Amit Kulkarni

मिसेस इंडिया क्वीनमध्ये मलायका परीक्षक

Patil_p

तुमचाही डांबर परफॉर्मन्स पाहता येईल

Patil_p
error: Content is protected !!