तरुण भारत

चेल्सी सुपर चषक फुटबॉल स्पर्धेतील विजेता

वृत्तसंस्था /बेलफास्ट

केपा अरिझाबालेगाच्या शानदार कामगिरीच्या जोरावर चेल्सी फुटबॉल क्लबने युफाच्या सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. चेल्सीने व्हिलारेलचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 6-5 अशा गोलफरकाने पराभव केला.

Advertisements

चेल्सी संघाने गेल्या वर्षीच्या फुटबॉल हंगामात युरोपियन करंडक फुटबॉल स्पर्धा शेवटी जिंकली होती. आता या संघाने युफाची सुपर चषक फुटबॉल स्पर्धा जिंकून 2021 च्या फुटबॉल हंगामाला प्रारंभ केला आहे. चेल्सी आणि व्हिलारेल यांच्यातील हा अंतिम सामना निर्धारित वेळेत आणि त्यानंतर जादा कालावधीत 1-1 असा बरोबरीत राहिल्यानंतर पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेतला. स्पेनचा गोलरक्षक अरिझाबालेगाने पेनल्टी शूटआऊटमध्ये दर्जेदार कामगिरी करताना व्हिलारेलच्या एका खेळाडूचा फटका रोखत चेल्सीला विजेतेपद मिळवून दिले. गेल्या मे महिन्यात पोर्टो येथे चेल्सी संघाने मँचेस्टर सिटी संघाचा पराभव करत दुसऱयांदा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा जिंकली होती.

Related Stories

महिला तिरंगी मालिका, विश्वचषक स्पर्धेसाठी रविवारी संघ निवड

Patil_p

टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत बाबर आझम अग्रस्थानी

Patil_p

32 विदेशी प्रशिक्षकांना मुदतवाढ

Patil_p

रियल माद्रिद संघात बेंझेमाचे पुनरागमन

Patil_p

महिला मल्ल पूजा धांडा कोरोनाबाधित

Patil_p

हॉकी इंडियाच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईनद्वारे शैक्षणिक कार्यशाळा

Patil_p
error: Content is protected !!